नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा होणार.
सुभाषचंद्र बोस हे भारतीय नागरिक होते, ज्यांच्या देशभक्तीने त्यांना भारताचे नायक बनवले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ ला झाला होता.
केंद्र सरकारने थोर स्वातंत्र्यसेनानी आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा शुभारंभ २३ जानेवारीला म्हणजे आज कोलकाता येथील ऐतिहासिक ‘विक्टोरिया मेमोरियल हॉल’ येथून करतील.
नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पुतणी चित्रा घोष यांच्या निधनावर आदरांजली अर्पण केली होती. नरेंद्र मोदी, "नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं शौर्य सर्वांना माहिती आहे", असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले होते.
गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. यामद्ये इतिहास अभ्यासक आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या परिवारातील सदस्य आणि आझाद हिंद सेनेतील काही सदस्यांचा समावेश करण्यात आला होता.
पराक्रम दिवस साजरा करण्याबाबत केंद्र सरकारकडून सूचना आणि कार्यपद्धती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. नवी दिल्ली, कोलकाता आणि आझाद हिंद सेनेशी संबंधित ठिकाणी जंयतीच्या कार्यक्रमांचं आयोजन केले जाणार आहे.
टिप्पण्या