Looks Does Matter?

Looks Does Matter?

आपण कसे दिसतो हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा एक भाग आहे त्या गोष्टीचा आपल्या स्वभावाशी, वागणुकीशी काही एक संबंध नाही, मात्र तरीही लोकांना गैरसमज होतातच. 
एखादी व्यक्ती दिसायला चांगली म्हणून स्वभावही चांगलाच असेल असे आपण गृहीत धरतो आणि त्याउलट जर एखादी व्यक्ती दिसायला बरी असेल तर त्या व्यक्तीचा स्वभाव चांगला आहे, असे गृहीत धरणे हि तितकेच चुकीचे. मुळात मुद्दा तोच आहे की, आपल्या दिसण्याचा आणि स्वभावाचा काही संबंध नाही. 
एखादी व्यक्ती आपल्याशी अगदीच वाईट वागत असेल, मात्र ती दिसायला चांगली आहे म्हणून आयुष्यभर त्या व्यक्तीसोबत आपण राहू शकत नाही, आणि रूप तर वयाप्रमाणे निघूनही जाते. उरतो तो फक्त स्वभाव आणि एखाद्याला दिलेली चांगली वागणुक. 
मात्र या सगळ्या गोष्टी आपल्याला कितीही पटत असल्या तरीही आपण नेहमी चेहऱ्याकडे पाहूनच 'Judge' करतो, त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल, तो इतरांशी कसा वागत असेल....... 
आणि हो! या साऱ्या स्पष्टीकरणासाठी एक उत्तम उदाहरण म्हणजे 'Arranged Marriage' ज्या नात्याची सुरुवातच एकमेकांचे चेहरे पाहून होते, मग ती व्यक्ती स्वभावाने कशी आहे याचा त्यावेळी काही फरक च पडेनासा होतो. 
आपले Looks हे Temporary आहेत आणि स्वभाव Permanent. हे माहिती असून देखिल त्याच त्याच चुका आपण नेहमी करतो. काही गोष्टी आपल्याला कळतात पण वळत नाहीत. एखाद्या व्यक्तीच्या दिसण्यावरून त्याचा स्वभाव ठरवणे हे किती चुकीचे आहे. 
स्वभाव समजून घेणं, समजणं या गोष्टींसाठी वेळ द्यावा लागतो मग च त्या हळू हळू उमगू लागतात. स्वभावाच्या प्रेमात पडल्या नंतर मग दुसऱ्या कोणत्याच गोष्टीने फरक पडत नाही. दुसरी कोणती च गोष्ट Matter करत नाही आणि त्या वेळी हा प्रश्न पडत नाही 'Looks Does Matter?'....... 






टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट