अपेक्षा
अपेक्षा
आपण एखाद्या व्यक्तीला खूप जवळची मानतो आणि सहाजिकच आपल्या मनाला देखील कळण्याअगोदर आपण त्या व्यक्ती कडून अपेक्षा ठेऊ लागतो आणि मग खरे नात्यांची परीक्षा सुरु होते.
आपल्या अपेक्षांच्या सागरात आपण असे बुडालेले असतो की, आपल्या हे देखील उमजत नाही की, आपल्याकडून हि त्या व्यक्तीच्या काही अपेक्षा असू शकतात.
अपेक्षा या सांगून पूर्ण करण्याची गोष्ट नसते त्यामुळे, एखादी गोष्ट आपण न सांगताच त्या व्यक्तीला समजावी आणि आपली अपेक्षा पूर्ण व्हावी हा समजच मुळात चुकीचा आहे.
या अपेक्षांच्या सागरात नाती मात्र पणाला लागतात. अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर सगळे आपल्या मनाविरुद्ध घडू लागते मग या सगळ्या गोंधळात 'लोक आपल्याला गृहीत तर धरत नाहीत ना?' असा प्रश्न पडतो.
टिप्पण्या