चंदीगडमध्ये १६ महिन्यांच्या बाळाचा ब्रेन ट्यूमर काढला, कसा जाणून घ्या.
चंदीगड येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (पीजीआयएमईआर) मधील डॉक्टरांनी यशस्वीरित्या १६ महिन्यांच्या मुलीच्या नाकातून मेंदूचा ट्यूमर काढून टाकला.
उत्तराखंडमधील रहिवासी असलेल्या बाळाला पीजीआयएमइआरकडे पाठविण्यात आले होते. मुलाच्या एमआरआयमधे हे उघड झाले होते की, त्या बाळाला ३ सेमी ट्यूमर आहे, जो लहान मुलासाठी मोठा समजला जातो, आणि त्यामुळे त्या बाळाच्या दृष्टिवर प्रभाव पडू शकतो.
हॉस्पिटलने असा दावा केला आहे की, जगातील सर्वात लहान रूग्ण, ज्यांच्यावर अशी शस्त्रक्रिया केली गेली आहे. ऑपरेशन करणार्या शल्य चिकित्सकांच्या टीममध्ये असलेल्या पीजीआयएमआर च्या न्यूरोसर्जरी विभागातील डॉ. धांडापनी एस.एस. ने सांगितले की सहसा सहा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांमध्ये अशी शस्त्रक्रिया केली जाते.
"५-७ वर्षापर्यंतच्या रुग्णांवर या प्रकारची ट्यूमर शस्त्रक्रिया डोक्याची कवटी उघडून केले जाते. अलीकडेच, आम्ही नाकातून ही शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे. यामधे एकच समस्या अशी आहे की, आपण केवळ सहा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या रुग्णावर ही शस्त्रक्रिया करू शकतो त्याहून कमी वय असलेल्या रुग्णांच्या नाकामधे जास्त जागा नसते आणि हाड खूप अपरिपक्व असते." असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “पहिल्यांदा याबद्दल विचार करणे खूपच जोखमीचे वाटत होते, परंतु आम्ही तसे करू शकू असा आमचा विश्वास देखिल होता.” ही शस्त्रक्रिया सुमारे सहा तास चालली.
त्या मुलीला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते आणि आता सुधारणा ही दिसून येत आहे. शस्त्रक्रियेनंतर दहा दिवसांनी, तीच्या दृष्टीमधे सुधारणा आहे आणि कोणतीही गुंतागुंत नाही. सीटी स्कॅन वरून असे समजले आहे की ट्यूमर पूर्णपणे काढण्यात यश आले आहे, असे पीजीआयएमइआरने म्हटले आहे.
टिप्पण्या