कोरोना लसीसंबंधीचे काही गैरसमज आज आपण दूर करूया.
कारोनाची लस आल्यापासून आपल्या कानावर खूप गोष्टी पडत आहेत, समज गैरसमज तर होतच राहतात. तुम्हाला देखिल काही गैरसमज झाले असतील, वाचून बघा सगळे गैरसमज दूर होतील.
१. लस अनिवार्य आहे:
असे अगदीच नाही, कोरोना लस ही स्वैच्छिक आहे. पण जर आपल्याला स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी असेल तर लस घेणे गरजेचे आहे.
२. लस असुरक्षित आहे:
नियामक संस्था सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या आधारावर निर्णय घेतील आणि, त्यानंतरच देशात या लसी आणल्या जातील. कारण सुरक्षितता हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, आणि त्याबद्दल जशी इतर लसींमधे काळजी घेतली जाते तशी आताही घेतली जाईल.
३. सक्रिय कोविड रुग्णांना लस आवश्यक आहे:
सक्रिय रुग्ण आणि ज्यांना कारोनाची लक्षणे जाणवत आहेत, अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांना लस आवश्यक आहे. कारण विषाणू पसरण्याचा धोका तितकाच आहे.
४. कोविड रुग्णांना बरे झाल्यानंतर लसची आवश्यकता नसते:
पूर्ण लस घेणे सगळ्यांसाठीच गरजेचे आहे, तुम्हाला पूर्वी कोरोना होऊन गेला असला तरीही. कारण आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ही लस मदत करते.
५. मधुमेहाच्या आणि कर्करोगाच्या रुग्णांसाठी लसी असुरक्षित आहेत:
लस जर सगळ्यात जास्त महत्वाची कोणासाठी असेल तर ती या रुग्णांसाठी आहे. या विषाणूंचा अधिक धोका या रुग्णांना आहे, त्यामुळे त्यांनी लस घेणे गरजेचे आहे.
६. लस घेण्याने दुष्परिणाम होतात:
लस तेव्हाच दिली जाईल जेव्हा ती पूर्णपणे सुरक्षित असेल. आणि जर त्याचा काही लोकांना दुष्परिणाम आढळला तर अगदीच क्षुल्लक असेल जसे की ताप येणे, अंग दुखणे ई.
७. लसी ताबडतोब प्रभावी आहेत:
लसीचा दुसरा डोस मिळाल्यानंतर दोन आठवड्यांनंतर परिणाम व्हायला सुरुवात होतो. एखाद्या औषधाचा परिणाम होण्यासाठी वेळ हा लागतोच.
टिप्पण्या