कोरोना लसीबद्दल जाणून घेऊया थोडीशी माहिती.
कोरोणाला हरवण्यासाठी फक्त लस पुरेशी नाही, असे का म्हंटले जातेय याबद्दल आज थोडे जाणून घेऊया. कोरोनाची लस बाजारात आली आहे हे जरी खरे असले तरी, एक नवीनच भीती लोकांच्या मनात घर करून बसली आहे. कोरोनाची लस ही शरीरासाठी सुरक्षित नाही किंव्हा त्या लसीची शरीराला गरज नाही.
हे सगळे पोलिओच्या लसीसोबत देखिल घडले होते, लोकांना या औषधावर विश्वास नव्हता आणि विश्वास प्राप्त करेपर्यंत मधे १४ वर्षे उलटली, आणि भारताला पोलिओमुक्त व्हायला आणखी १६ वर्षे लागली.
भारतात अशा तीन कंपनी आहेत ज्या कोरोनाची लस बनवत आहेत. फायझर, भारत बायोटेक, सिरम इन्स्टिट्यूट. या तिन्ही पैकी फायझरची लस ही महागडी असणार आहे आणि त्यामुळे ती सगळ्यांना परवडेलच असे नाही. आणि आता राहता राहिला प्रश्न भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूटचा.
सरकारचे असे म्हणणे आहे की, लस टप्प्या टप्प्याने देण्यात येतील त्यामधे पाहिले प्राधान्य दिले जाईल आरोग्य सेवा पुरवणाऱ्या कर्मचार्यांना, ज्यांची संख्या आहे जवळ जवळ एक कोटी, दुसऱ्या क्रमांकावर आहेत पोलिस, नर्स तसेच वयोवृध्द लोक ज्यांचे वय ५० पेक्षा जास्त आहे, आणि त्यानंतर ५० पेक्षा कमी वय असलेले मात्र एखाद्या गंभीर आजाराने त्रस्त असलेले.
लोकसंख्येच्या मानाने जर तुम्ही या श्रेणीमधे मोडत नसाल तर, तुम्हाला ही लस कदाचित पुढच्या वर्षी मिळू शकते. मात्र लस उपलब्ध असूनसुद्धा जर लोक ती घेत नसतील तर? काही देशांमध्ये ही समस्या निर्माण झाली आहे. जनतेला पुरावे देऊन देखिल त्यांचा सरकारवर आणि कारोनाच्या लसीवर विश्वास नाही.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन चे असे म्हणणे आहे की, जर लसीसंबंधीचे लोकांचे मत कायम राहिले, तर अशी परिस्थिती येईल की वेगवेगळ्या देशांकडे लस उपलब्ध आहे मात्र जनता ती लस घ्यायला तयार नाही. असे झाले तर ही लढाई कधीच न संपण्यासारखी होऊन बसेल. मान्य आहे की आपल्यापर्यंत कोरोणाची लस पोचायला थोडा वेळ लागणार आहे मात्र याचा अर्थ नाही की आपण सावधगीरीने वागणे सोडायचे.
टिप्पण्या