गुंतवणुकीच्या दृष्टीने काही महत्वाच्या घडामोडी.

लॉकडाऊनमुळे खूप गोष्टींमधे खूप मोठे बदल घडले आहेत. काही चांगले तर काही वाईट, आणि तसेच गुंवणुकीच्या बाजारात देखिल घडले आहेत. आता त्यांचा परिणाम चांगला होती की वाईट हे भविष्यातच कळेल. त्या बदलांचा आपल्या भारत देशाला फायदा होईल, की नुकसान काहीच सांगता येणार नाही.

काही उद्योगधंदे पूर्णपणे ठप्प झाले, तर काहींना नवी उभारी मिळाली. कदाचित कोणालाच वाटले नसेल अशा गोष्टी घडल्या आहेत. ज्यांना लॉकडाऊन मधे फायदा झाला तो अगदी अफाट झाला, आणि ज्यांचे नुकसान झाले त्यांचे अगदी सगळेच बुडाले.

टेसला ही कंपनी सहाव्या क्रमांकावर आली आहे, आणि ही अमेरिकेतली सगळ्यात मोठी कंपनी आहे. या कंपनीने टोयोटा, फोर्ड, जनरल मोटर्स या सगळ्या कंपन्यांना मागे टाकले आहे. आणि या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत लॉकडाऊनमधे.

बर्गर किंग बद्दल तर सगळ्यांनी ऐकलेच असेल, भारतातील बर्गर किंग 'आय पी ओ' म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफरींग ही गुंतवणुकीसाठी उत्तम अशी योजना घेऊन आले आहेत. म्हणजेच या योजनेमार्फत एक्विटी शेअर मधे पैसे गुंतवता येतील. 

भारतामधे चालू असलेले चीन च्या मालावरील बहिष्कार, किंव्हा भारत सरकार ने आणलेली बंदी या कारणांमुळे चीन मधील गुंतवणूकदारांनी आता इंडोनेशिया मधे गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे, जे पूर्वी भारतात गुंतवणूक करत होते. 

या सगळ्या गोष्टींचा आपल्या देशावर कसा परिणाम होणार आहे? शक्यता दोन्ही ही आहेत, चांगला झाला तर कोणत्या तरी नवीन गोष्टींना सुरुवात होईल, कदाचित नवीन उद्योग धंद्यांचा प्रारंभ होईल, नवीन लोकांना संधी मिळेल.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट