तीन अशा गोष्टी ज्या आयुष्यात टाळणे फायद्याचे ठरेल.
कोणाला तरी आनंद मिळेल म्हणून काहीतरी करतो आणि मग आपल्याला त्या गोष्टीचा मनस्ताप होतो, असे कधीच करू नका. दुसऱ्याच्या आनंदाचा जितका विचार कराल तितकाच स्वतःला त्या गोष्टीचा त्रास होणार नाही याची देखिल काळजी घ्या.
काही निर्णय आपण लोकांच्या दबावात येऊन किंवा परिस्थितीनुसार घेतो, मात्र जे निर्णय आपल्याला आपल्या भविष्य काळात घातक ठरणार असतील असे निर्णय घेणे नक्की टाळा. कारण जर समस्या असेल तर त्याचा उपाय देखिल नक्की सापडेल.
भारतीय पालक कसे असतात हे काही वेगळं सांगायची गरज नाही. त्यांचं जितकं प्रेम असतं आपल्यावर तितकं कोणीच करू शकत नाही, म्हणून ते जे काही सांगतील ते ऐकायलाच हवं असं अगदीच नाही. आयुष्य आपले आहे त्यामुळे त्याचे निर्णय घेण्याचा अधिकार देखिल आपल्यालाच आहे. मग ते आपला आयुष्याचा जोडीदार निवडणे असो किंवा आपले करिअर.
दुसरा आणि महत्वाचा मुद्दा जर तुम्ही एखाद्या व्यक्ती सोबत नात्यात असाल तर, त्या माणसाशी संबधित सगळ्या गोष्टींचा परिणाम आपोआप तुमच्यावर देखिल होतो आणि त्यामुळे जर त्या व्यक्तीला तुमच्यावर विश्वास नसेल, त्या व्यक्तीला तुमच्या बद्दल आदर वाटत नसेल तर तो कधीच वाटणार नाही. त्यामुळे अशा नात्यातून वेगळं होणच योग्य ठरेल.
स्वतःला कधीच कमी समजू नका. ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे जी आपण स्वतःसोबत करतो, स्वतःला कमी समजून. जर तुम्ही असं मानत असाल तर, आयुष्यात तुम्ही कितीही, काहीही मिळवले तरी ते कमीच आहे असे वाटत राहील. मी या गोष्टीसाठी पात्रच नाही असे वाटेल.
सगळ्याच गोष्टी लगेच जमतील असं नाही, पण प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. एका दिवसात नाही पण, काही दिवसात हळू हळू स्वतःच्या मनाला समजावत की, कोणती गोष्ट योग्य आहे, आपल्या भल्याची आहे. हे समजले की, या सगळ्या गोष्टी देखिल नक्की जमतील.
टिप्पण्या