उद्योगाच्या दृष्टीने भारत, चीनवर मात करू शकतो का?

उत्पादनाच्या दृष्टीने चीन हा देश अवाढव्य आहे यात काही वादच नाही, परंतु हळू हळू ती जागा भारत घेऊ शकतो का? या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी किंव्हा त्या उत्तराच्या जवळ जाण्यासाठी काही मुद्दे, जे कदाचित आपला डोक्यातला गोंधळ थोडा कमी करतील.

लोकसंख्येच्या दृष्टीने सगळ्यात पुढे असलेला हा देश, उत्पादनाच्या बाबतीत ही पुढे आहे. मात्र गुणवत्तेच्या बाबतीत नेहमीच मार खाल्ला आहे. भारत आणि चीन हे लोकसंख्येच्या बाबतीत एका खालो खाल येतात, मात्र उद्योगांमधील उत्पादन हे चीनमधे जास्त आहे, पण हे चित्र कदाचित पालटू शकते.

टाटा सन्स ने अशी योजना बनवली आहे की, जर आय फोन भारतात बनवले गेले, तर टाटा सन्स ही कंपनी ११००० कोटी इतके पैसे ऍपल या कंपनी मधे गुंतवायला तयार आहेत. आणि ऍपल ने देखिल भारतचेच समर्थन केले आहे, चीन चे नाही.

शाओमी ही सगळ्यात मोठी फोन बनवणारी कंपनी आहे, जी आहे चीन मधली. पण तीच कंपनी आता त्यांचे ९९% फोनचे उत्पादन हे भारतात करणार आहे, चीन मधे नाही. आणि या कंपनी चे सात कारखाने भारतात आहेत. 

आणि आत्ताचे च उदाहरण घ्यायचे झाले तर, कोरोणा ची लस बनवण्याचा त्याच्या उत्पादनाचा जास्तीत जास्त वाटा हा भारताकडे आहे, बील गेट्स यांची संस्था देखिल भारतामधूनच उत्पादनाला प्राधान्य देत आहेत.

या सगळ्या गोष्टी सकारात्मकतेकडे घेऊन जाणाऱ्या आहेत, आणि भारताला प्रगतीच्या मार्गावर. या गोष्टींच्या मार्फत भविष्यात जे काही घडेल ते देशासाठी आणि देशवासीयांसाठी भल्याचेच ठरेल अशी आशा करू.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट