भारतात आपल्या उद्योगाचा प्रवेश करण्या अगोदर या कंपन्यांनी केले असे काही बदल जे त्यांनी कधीच केले नव्हते.
भारतात एखादे नवीन उत्पादन जर आणायचे असेल आणि ते आणल्यानंतर जर भारतीयांना ते आवडले आणि त्यांनी ते खुल्या मनाने स्वीकारले तर, त्याचा एवढा फायदा कंपन्यांना होतो जो त्यांना कुठेच होऊ शकत नाही.
आणि म्हणूनच एखाद्या उत्पादनाचा प्रवेश जर भारतात करायचा असेल, तर तो भारतीयांच्या हिशोबाने करणेच कंपन्यांना फायद्याचे ठरते. आणि तो फायदा खूप कंपन्यांना खूप वेळा झाला देखिल आहे. भारताची लोकसंख्या पाहता, भारताबाहेरील कंपन्यांना भारतीय बाजारात हुशारीने प्रवेश करणेच योग्य ठरले आहे.
तुम्हाला माहित आहे का? अमेझॉन ही कंपनी त्यांचे उत्पादन विकण्याअगोदर ग्राहकाकडून पैसे घ्यायची आणि मगच ते उत्पादन पोहचवले जायचे. परंतु भारतीयांना अशा ऑनलाईन खरेदी वर तितका विश्वास नव्हता आणि म्हणून च जगात पहिल्यांदा अमेझॉनने कॅश ऑन डिलिव्हरी चा पर्याय भारतीयांसाठी खुला करून दिला.
दुसरी कंपनी आहे मॅकडोनाल्ड. मॅकडोनाल्ड भारतात प्रवेश करण्या अगोदर शाकाहारी असे काहीच उपलब्ध नव्हते. मात्र फक्त आणि फक्त भारतीय बाजारात प्रवेश करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले. भारतीयांना बटाटा पसंत आहे हे त्यांना माहीत होते आणि म्हणूनच आलू टिक्की बर्गर चा भारतात प्रवेश झाला आणि मॅकडोनाल्ड च्या मेनूमधे शाकाहारी बर्गर चा.
डंकिन डोनट्स ने देखिल अशाच प्रकारचा एक मार्ग निवडला. त्यांना माहीत होते की, भारतीय फक्त डोनट्स खाण्यासाठी प्रवेश नाही करणार आणि म्हणूनच त्यांनी मस्का आणि चहा चा प्रवेश त्यांच्या मेनू मधे केला. जगात पहिल्यांदा फक्त आणि फक्त भारतासाठी.
भारताबाहेरील कंपन्यांना ही गोष्ट खूप चांगली माहित आहे की, भारताच्या लोकसंख्येमुळे त्यांच्या उत्पादनाचा फायदाच होणार आहे. आणि त्यामुळे काही गोष्टी बदलणे ही एक उत्तम गुंतवणूक आहे कंपनीच्या फायद्याच्या दृष्टीने.
टिप्पण्या