तुम्हाला ही असे वाटते का की, आपल्यामध्ये आत्मविश्र्वासाची कमी आहे? तर हे मुद्दे नक्की लक्षात घ्या.

जर आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल तर माणूस काहीही करू शकतो, त्याने जर मनात पक्के ठरवले की मी हे करणारच तर तो ते नक्की मिळवू शकतो. मात्र त्याला आत्मविश्र्वासाची जोड असावी लागते. आणि ती असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही, इतकेच काय आत्मविश्वासाच्या जोडीने एखादी अशक्य गोष्ट देखिल शक्य करता येऊ शकते.

खूप वेळा असे होते की, आपल्या वागण्यामधे कीव्हा बोलण्यामधे आत्मविश्वास नाही म्हणून आपल्या हाती आलेली सोन्यासारखी संधी आपण गमावून बसतो, आणि मग फक्त पश्चात्तापच करावा लागतो. असे जर होऊ नये असे वाटत असेल तर पुढील मुद्दे नक्की वाचा.

आपल्या आतला जो आवाज असतो, तो ओळखायला शिका, त्याचे ऐकायला शिका, आणि तेच करा. कारण आपल्या आतला तो आवाज कधीच खोटा किंव्हा चुकीचा नसतो. आपल्याला आतून एखादी गोष्ट वाटत असेल तर तसेच आणि तेच करा, तुम्हाला तुमच्या त्या निर्णयाचा कधीच पश्चात्ताप होणार नाही.

छोट्या ध्येयांची आखणी करा, आणि प्रयत्न करा की ते ध्येय साध्य होतील. थेट मोठी ध्येय आखून तीच पूर्ण करू, असे कधीच ठरवू नका. प्रत्येक गोष्टीची एक पद्धत असते प्रक्रिया असते आणि त्या प्रमाणेच त्या घडतात त्यामुळे, उगाच ताण घेण्यात काहीच अर्थ नाही. 

आपल्याला मिळालेले प्रत्येक छोटे मोठे यश साजरे करायला शिका. कारण या छोट्या यशातून मिळणारा आनंद जेव्हा आपण साजरा करतो त्यामधुनच आपल्याला पुढे आणखी काम करण्याची प्रेरणा मिळत असते. आपण काहीतरी मिळवले आहे, प्राप्त केले आहे याची जाणीव होते.

माणूस यशाचा शिखरावर पोहचू किंव्हा पायथ्याशी असो, त्याचे कृतज्ञ असणे, आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी आभारी असणे खूप गरजेचे असते. नाहीतर मग आयुष्यात कितीही यश मिळाले, पैसा आला तरीही तो माणूस असमाधानीच राहतो. म्हणून कृतज्ञता हा गुण असणे सगळ्यात महत्वाचे आहे.

आत्मविश्वास जितका माणसाच्या वागण्या बोलण्यात दिसत असतो, त्याहून जास्त तो त्याच्या डोळ्यात दिसतो. डोळ्यात दिसणारा आत्मविश्वास हा कधीच खोटा नसतो, आणि ते समोर असलेल्या व्यक्तीला लगेच समजते. 


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट