आपल्या आजू बाजूच्या लोकांना नैराश्यापासून दूर ठेवण्यासाठी, अशी मदत नक्की करा.
आपल्या आजू बाजूला असे खूप लोक आहेत, जे रोज नैराश्याला सामोरे जात असतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधे त्यांना नकारात्मक विचार येतात. अशा वेळी त्यांना फक्त कोणीतरी ऐकून घेणारं हवं असतं, त्यांना कोणताही सल्ला किंव्हा सहानुभूती नको असते. फक्त आपल्यासोबत कोणीतरी आहे, ही भावनाच सगळ्यात महत्वाची असते.
आपल्यावर कोणाचा तरी विश्वास आहे, आपल्याला जो त्रास होतो आहे तो खरा आहे, याबद्दल कोणालातरी आपल्यावर विश्वास आहे, ही गोष्ट देखिल अशा लोकांसाठी खूप महत्वाची असते. कोणीतरी साथ देणारं आहे ही भावना देखिल सुखावणारी असते.
आपले मित्र मैत्रीण किंव्हा आपल्या जवळचे लोक जर नैराश्याच्या आहारी गेले असतील, आणि ते आपल्या समस्यांबद्दल किंव्हा आपल्या भावणांबद्दल बोलत नसतील तर, त्यांना जास्तीत जास्त प्रश्न विचारा. यामुळे होईल असे की ते त्या प्रश्नांची उत्तरे देता देता त्यांच्या मनात जे काही साचलेले आहे त्याबद्दल देखिल बोलतील.
त्यांना जाणीव करून द्या, दाखवून द्या की तुमचे त्यांच्यावर खूप प्रेम आहे, तुम्हाला त्यांची काळजी आहे, त्यांची गरज आहे. पण हे फक्त बोलून दाखवणंच गरजेचं नाही, त्यांना तसं दिसलं देखिल पाहिजे. तरच त्यांना असं वाटेल की आपल्या अस्तित्वाने कोणाला तरी फरक पडतो.
जर आपल्याला कोणाला मदत करायची असेल तर त्या गोष्टी बद्दल आपल्याला माहिती असणं ही तितकंच गरजेचं आहे. म्हणूनच जर आपल्या जवळच्या लोकांना नैराश्यातून बाहेर आणायचे असेल तर त्या बद्दल खरी माहिती जाणून घ्या, फक्त इकडून तिकडून ऐकलेल्या गोष्टी वर विश्वास ठेऊ नका.
आपल्या जवळची माणसे आपल्या आयुष्यात खूप जास्त महत्वाची असतात. त्यामुळे वेळ आहे तोपर्यंत त्यांना मदत करा, एकदा वेळ निघून गेली की फक्त आपण पश्चात्तापच करू शकतो बाकी आपल्या हातात काहीच उरत नाही. मानसिकरित्या किंव्हा भावनिकरित्या जर कोणाला आपली मदत लागली तर जरूर करा.
टिप्पण्या