या काही चुका आपण करतो, जेव्हा आपल्यासमोर नकार येतो
नकार कोणाच्या आयुष्यात येत नाही, प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी नकाराला तोंड द्यावेच लागते. नकार आला म्हणजे सगळे संपले असे होत नाही, सगळी आशा संपली असे नसते कुठूनतरी आशेचा एक किरण नक्की डोकावतो पण त्यासाठी तेवढा वेळ देणं ही तितकंच महत्वाचं आहे.
आपल्याला जर आयुष्यात कोणत्याही बाबतीत एखाद्या कारणाने नकार मिळाला असेल तर, त्यामधून आपण काय शिकलो आणि आपल्याला त्या गोष्टीमध्ये काय सुधारणा करण्याची गरज आहे याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्वाचे असते.
जेव्हा आपल्याला आयुष्यात नकार मिळतो त्याअगोदर आपल्या डोक्यात खूप साऱ्या कल्पना असतात, आपल्या मनात खूप साऱ्या आशा असतात मात्र त्या एका नकाराणे ते सगळे आपण विसरून जातो आणि लक्षात राहतो तो फक्त नकार. तसे करण्याची काहीच गरज नाही, आपण आपले प्रयत्न कधीच सोडायचे नाही.
आपण स्वतःवर शंका घ्यायला सुरुवात करतो, आपल्याला असे वाटू लागते की, आपण हे सगळे करण्याच्या पात्र च नाही, आपण हे करूच शकत नाही, आपण जे करतो आहे ते आपल्यासाठी योग्य नाही, आपल्याला ते करणे जमणार च नाही या आणि अशा खूप शंका मनात घर करून राहतात, आणि योग्य वेळीच या शंका कुशंका मधुन बाहेर पडणं योग्य आहे.
आपल्याला असे वाटू लागते की, आपल्याला मदत करणारे कोणी नाही, आपली ओळख नाही म्हणून आपल्याला हे नकार येत आहेत. जर आपल्याकडे पैसा असता मोठ्या लोकांच्या ओळखी असत्या तर आपल्याला या सगळ्या गोष्टींना तोंड द्यायला लागले नसते.
जर तुम्ही आयुष्यात काही करत असाल तर त्यासाठी पूर्ण मेहनत करा, मान्य आहे नकार मिळतील पण त्यानंतर यश देखिल मिळेल. नकारांना सामोरे जावे लागते म्हणून प्रयत्न करणे कधीच थांबवू नका, कारण जर तुमचे प्रयत्न थांबले तर नकार थांबतील, पण त्यासोबत तुम्हाला मिळणारे यश देखिल कधीच मिळणार नाही.
टिप्पण्या