भगवद् गीते मधून शिकता येण्यासारख्या काही गोष्टी, ज्या आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यात निर्णय घेण्यासाठी उपयोगी पडतील.
भगवद् गीता ही खूप पवित्र मानली जाते, त्यामधे जीवनाबद्दल केलेले उपदेश हे आजही लोक वापरतात. म्हणूनच न्यायालयात देखिल गीतेवर हात ठेऊन शपथ घ्यायला सांगतात.
महाभारतातल्या महायुधाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास भगवद् गीता ही मार्गदर्शन म्हणून सांगितली होती. आणि आजही त्या नियमांचे पालन करणारे लोक खूप पुढे जातात, खूप सुखी राहतात, संकट काळी काय करायचे हे त्यांना सहज कळते.
भगवद् गीतेमधे असे सांगितले आहे की, आपल्या आयुष्यातला कोणताही निर्णय हा घाईत आणि रागात घेऊ नका त्यामुळे आपलेच नुकसान होते. घाईत आणि रागात असताना आपण सगळ्या बाजूंचा विचार करत नाही, आणि आपल्या हातून चुकीचा निर्णय घेतला जातो, त्यामुळे चुकूनही असे करू नका.
आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट स्थिर असेल तर ती आहे बदल. बदल हा माणसाच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा भाग आहे, मग तो बदल चांगला असो किंव्हा वाईट तो घडत राहणारच. आपली इच्छा असो किंवा नसो. त्या बदलातून काय घडवायचे हे मात्र पूर्णपणे आपल्या हातात असते.
आपण जे कर्म करतोय त्याचे नेमके काय फळ मिळेल, याचा विचार करत बसू नका. जे काही काम तुम्ही करत असाल ते प्रामाणिकपणे करा, जर त्यामधून कोणाचे नुकसान होणार नसेल, आणि तुम्ही जे काम करत आहात ते योग्य आणि बरोबर असेल तर त्याचे चांगले फळ तुम्हाला नक्की मिळेल.
भगवद् गीते च्या प्रभावातून हजारो लोक त्यांचे न सुटणारे प्रश्न सोडवत आहेत, आणि निर्णय योग्य प्रकारे घेत आहेत. त्यामधे दिलेला सार हा आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या मोठ्या घटना आणि येणारी संकटे यांवर कशाप्रकारे मात करायची हे शिकवतात.
टिप्पण्या