काही अशा गोष्टी ज्यावरून तुम्हाला कळेल की, तुम्ही नेतृत्व करू शकता की नाही?

तुम्हाला जर नेतृत्व करण्याची इच्छा असेल मग ते कोणतही काम असो, तर हे गुणधर्म तुमच्यामधे आहेत का? हे नक्की तपासून पाहा. एका नेत्याला नेतृत्व करण्यासाठी खूप गोष्टींची गरज असते, महत्वाचे म्हणजे त्याच्यावर सगळ्यांचा विश्वास असणे सगळ्यात गरजेचे आहे.

तो जे काही करतो आहे ते आपल्या भल्याचे आहे, हा ठाम विश्वास असणे महत्वाचे आहे. त्याचा इतरांवर प्रभाव असणं ही तितकंच गरजेचं आहे. एखादे संकट आले तर तो त्या संकटाला कशा प्रकारे आणि कोणत्या पद्धतीने तोंड देतो याकडे सगळ्यांचेच लक्ष असते.

जर तुम्हाला एखाद्या कामात नेतृत्व करायचे असेल तर, तुम्हाला चांगला श्रोता असणे सगळ्यात महत्वाचे आहे. 'कमी बोलणे आणि जास्त ऐकणे' हा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे, जो प्रत्येक नेत्यामध्ये असलाच पाहिजे. जर तुम्ही ऐकून घेतले तरच तुम्ही एखाद्या समस्येवर उपाय शोधून काढू शकता, तरच तुम्ही एखाद्याने मांडलेला प्रस्ताव योग्य आहे की नाही ते ठरवू शकता.

आपल्याला स्वतः वर विश्वास आहे, पण तरीही जर गरज लागली तर मदत घेणे आणि एखाद्याकडून मदत घ्यायची असेल, तर त्यामधे अजिबात कमीपणा न मानणे. या गोष्टीमधे खूप लोक आपला अहंकार आडवा आणतात. मात्र जर तुम्हाला एक चांगला नेता व्हायचे असेल, तर आपला अहंकार कोणत्याच गोष्टीच्या आड येऊ देऊ नका.

सगळ्यात महत्वाचा गुणधर्म म्हणजे, प्रत्येकाला आदराने वागवणे. तुम्ही कितीही मोठे झालात तरीही आपल्या खालच्या दर्जावरील लोकांना त्याच आदराने वागवने, त्यांचा आदर करणे मग कोणतीही परिस्थिती असो किंव्हा कोणत्याही लोकांसोबत तुम्ही असाल. हा गुणधर्म कधीच सोडू नका.

नेतृत्व करणे ही सोपी गोष्ट नक्कीच नाही, आपल्यामध्ये काही गुणधर्म जन्मजात च असतात तर काही आपण पर परिस्थितीमुळे, तर काही आपण आपल्या अनुभवांतून शिकत असतो. ज्या व्यक्तीला कोणता गुणधर्म कुठे आणि कसा वापरायचा हे अचूक कळते तोच व्यक्ती नेतृत्व उत्तमरित्या करू शकतो.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट