जर तुम्हाला स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणायची असेल तर हे नक्की करून पाहा.

काळानुसार चालणं ही काळाची गरज असते आणि त्यामुळे आपल्यामध्ये बदल घडवून आणणं ही तितकंच गरजेचं आहे. पण कधी कधी हे बदल कसे घडवून आणायचे हेच नेमकं कळत नाही. मग आपण वेग वेगळे पर्याय निवडतो आणि जर ते चुकीचे निघाले तर आपला वेळही जातो आणि काही नवीन करण्याचा उत्साह ही निघून जातो.

काळा बरोबर चालणे कितीही गरजेचे असले तरी त्यासाठी योग्य पर्याय निवडने ही तितकेच गरजेचे आहे. एक चुकीचा निर्णय आणि तुमची मानसिक स्थिती अजून च धासळण्याची शक्यता आहे. म्हणजे आपण जे काही करत आहोत ते काळजीपूर्वक करणे ही तितकेच महत्वाचे आहे.

असं म्हणतात ना! ' वाचाल तर वाचाल ' वाचन हा एक उत्तम पर्याय आहे, चालू घडामोडी चे वाचन. त्यासाठी तुम्ही वर्तमानपत्र, मासिकं यांचा वापर करू शकता. त्यामुळे तुम्हाला आजू बाजूला घडणाऱ्या गोष्टींची माहिती ही मिळेल आणि तुमचे ज्ञान ही वाढेल.

आणखी एक पर्याय आहे, आपले ज्ञान वाढवण्याचा. तो म्हणजे आपल्या आजू बाजूचे लोक ओळखा, त्यांच्याशी संवाद साधा. कारण हे तेच लोक आहेत जे तुमच्या यशामध्ये किंव्हा अपयशामधे भागीदार असतात, हे तेच लोक आहेत जे तुम्हाला उभं राहायला मदत करू शकतात किंवा पूर्णपणे उध्वस्त करू शकतात.

जर एखादी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर, तुम्ही कसे अपयशी ठरत चालला आहात असे म्हणून प्रयत्न करणे सोडू नका. स्वतःवर थोडे प्रेम दाखवा, तुम्ही किती मजबूत आहात एखादी गोष्ट करण्यासाठी हे अगोदर स्वतःला कळू द्या. स्वतःशी जरा प्रेमाने वागा, थोडा संयम ठेवा आणि प्रयत्न करत रहा.

बाहेरून बदलनं जितकं गरजेचं आहे तितकंच मानसिक दृष्टीने आपण आपली काळजी किती उत्तम रित्या घेत आहोत हेदेखील गरजेचे आहे. 


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट