काही असे लोक ज्यांच्यापासून आपण लांबच बरे.

आपल्या आजू बाजूचे लोक कसे आहेत, आपण कोणत्या मानसिकतेच्या लोकांमधे वावरतो, याचा आपल्या जीवनावर आणि आयुष्यातल्या निर्णयांवर खूप मोठा फरक पडतो. त्यामुळे आपल्या आजू बाजूला कोण असले पाहिजे, कसे लोक असले पाहिजेत याचा खूप काळजीपूर्वक विचार करा.

कारण आपले मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. आणि ते स्थिर राहते आपल्या आजू बाजूच्या लोकांमुळे. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या खूप गोष्टी त्यांना कशाप्रकारे हाताळायचे, स्वतःला कसे सांभाळायचे हे कधी कधी आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून त्यांच्या अनुभवातून शिकत असतो.

आणि यामधील एक आहेत अहंकारी लोक, ज्यांच्यापासून आपण लांबच बरे असे आपल्याला लगेच जाणवते. ते स्वतःसमोर आणि आपल्या अहंकारासमोर कोणालाच मानत नाहीत. आपणच कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याचा ते नेहमी प्रयत्न करत राहतात. अगदी कोणाला एखादा सल्ला द्यायचा असला तरी, त्यामधे स्वतःला सगळं श्रेय कसे मिळेल याचा ते जास्त विचार करतात.

दुसऱ्या प्रकारचे लोक असे आहेत ज्यांना आयुष्यात कितीही काहीही मिळाले तरी ते, त्या गोष्टीसाठी कृतज्ञ नसतात. नेहमी त्यांना दुसऱ्याकडे असणाऱ्या गोष्टी चांगल्या वाटतात, आपल्याकडे जे काही आहे त्यात आपण सुखी नाही आणि दुसऱ्याकडे खूप काही आहे आपल्याकडे काहीच नाही असे वाटत असते. 

सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या प्रकारच्या लोकांपासून तर आपल्याला चांगल्या गोष्टीबद्दल पण वाईट ऐकायला मिळेल असे आहेत नकारात्मक लोक. कोणतीही चांगली बातमी अशा लोकांना सांगितली तर त्यामधे देखिल काहीतरी खोट शोधून काढतील असे असतात हे लोक. एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात करायला गेलो तर ती का करू नये यासाठी हजारो कारणे देतील असे लोक.

आपल्या आजू बाजूला कसे लोक असले पाहिजे हे पूर्णतः आपल्या हातात असते. जर असे वाटले की असे काही लोक आपल्या भविष्यासाठी किंव्हा मानसिक आरोग्यासाठी योग्य नाहीत तर, वेळ हातात आहे तोपर्यंत अशा लोकांपासून अंतर ठेऊन वागलेलच बरं.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट