मुकेश अंबानी आणि रिलायन्स बद्दलच्या अशा काही गोष्टी जाणून घ्या, ज्या कदाचित तुम्हाला माहित नसतील.

मुकेश अंबानी हे नाव सगळ्यांच्याच अगदी परिचयाचे असेल, सगळ्यात श्रीमंत माणसांमध्ये गणती होणाऱ्यांमधले हे एक नाव आहे. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या आता आपण जाणून घेणार आहोत. काही गोष्टी रिलायन्स इंडस्ट्रीजबद्दल तर काही मुकेश अंबानी यांच्या बद्दल.

सर्वात पहिलं आपण जाणून घेऊया मुकेश अंबानी यांच्या बद्दलच्या काही गोष्टी, त्यांच्या व्यवसायातील काही निर्णय जे समाजात बदल घडवून आणण्यासाठी खूप मोलाचे आहेत. या गोष्टींच्यामार्फत ते खूप वर्षांपासून चालत आलेल्या काही गोष्टी, ज्यांना बदलांची खरच गरज आहे अशा घडणार आहेत. 

मुकेश अंबानी हे सगळ्यात हुशार व्यापारी आहेत यात काही शंकाच नाही, किंव्हा यावर दुमत होऊच शकत नाही. म्हणूनच ते आज त्या जागी आहेत, त्यांना ग्राहकाची मानसिकता ओळखणे खूप चांगले जमते.

रिलायन्स इंडस्ट्रीज ने नुकतेच वेग - वेगळ्या उद्योगांमधे प्रवेश केला आहे, पण हे सगळे योजना आखून करण्यात आले आहे. आपण जाणून घेऊया काय आहेत त्या योजना.

त्यांची सगळ्यात पहिली योजना आहे, आपल्या भारत देशाचे रूपांतर डिजिटल सोसायटी मधे करण्याची. तंत्रज्ञानाच्या मदतीने या गोष्टी शक्य आहेत पण त्या तंत्रज्ञानाची उपलब्धता करून देणं आणि या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचणं हे सगळ्यात महत्वाचे आहे.

दुसरी आणि सगळ्यात महत्वाची योजना म्हणजे, भारतातील शिक्षण प्रणालीचे सगळे लक्ष चातूर्यावर, कौशल्यावर असले पाहिजे. फक्त आणि फक्त पुस्तकी ज्ञान महत्वाचे नाही, त्याहीपेक्षा जास्त वेगळे ज्ञान अवगत असणे गरजेचे आहे.

तिसरी योजना अशी की, आतापर्यंत भारतात वापरले जाणारे जीवाश्म इंधने उदाहरणार्थ: कोळसा, तेल ई. चा वापर न करता, अक्षय ऊर्जेचा वापर केला जावा उदाहरणार्थ: सौर ऊर्जा, पवन उर्जा ई. यांचा नक्कीच आपल्या देशाच्या भविष्याच्या दृष्टीने फायदाच होईल.


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट