भारतीयांमध्ये बारीक होण्याचे एवढे वेड का आहे.
खूप मुलींना त्यांच्या जाड असण्यावरून ऐकून घ्यावे लागते, का? तर त्या बारीक नाहीत म्हणून किंव्हा समाजाच्या दृष्टीने परिपूर्ण नाहीत म्हणून. सुंदर दिसण्यासाठी बारीक असणं गरजेचं आहे. खरच?
नक्कीच आपल्या अरोग्याच्या दृष्टीने जर आपल्याला वाटले की, आपण व्यायाम करायला हवा किंव्हा योग्य अन्न खायला हवे तर तसे नक्की करावे, पण फक्त स्वतःसाठी लोक आपल्याला बोलतात म्हणून नाही.
ज्या लोकांना आपली शरीरयष्टी आवडत नाही ते लोक बारीक होण्यासाठी प्रयत्न करतात, पण हे फक्त स्त्रियांच्या बाबतीत होत नाही, पुरुषांना सुद्धा हे सगळे सहन करावे लागते. पण असं आढळून आलेलं आहे की शरिराबद्दल बोलल्याचा परिणाम हा स्त्रियांवर जास्त होतो.
हिंदी सिनेमाचा यामागे सगळ्यात मोठा हात आहे. आपल्या अभिनेत्री कशा दिसतात त्यावरून आपण पण तसेच दिसले पाहिजे असे वाटते. त्यांच्या रेखीव दिसणाऱ्या चेहऱ्यापेक्षा जास्त त्या किती बारीक आहेत, त्यांच्या शरीराची ठेवण कशी आहे, त्याकडे जास्त लक्ष जाऊ लागले.
पण सुरुवातीपासून तसे नव्हते, जुन्या सिनेमांमध्ये अभिनेत्री दिसायला किती रेखीव आहे आणि त्यांचा अभिनय किती उत्तम आहे या गोष्टींनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. १९९१ साली जेव्हा भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने काही निर्णय घेण्यात आले तेव्हा पाश्चिमात्य देशांना उद्योग धंद्यासाठी अधिक सवलती देण्यात आल्या आणि त्यामुळे पाश्चिमात्य देशांचा जास्त प्रभाव पडू लागला.
वजन कमी करणे कधी कधी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते, त्याचा परिणाम स्त्रियांच्या मासिक पाळी वर देखिल होऊ शकतो आणि गर्भधारणे मधे देखिल. भारतात तर अशी परिस्थिती आहे की, तुम्ही एखादी सामान्य स्त्री असाल किंव्हा एखादी प्रसिद्ध अभिनेत्री, जर तुम्ही बारीक नसाल तर लोक तुम्हाला तुमच्या शरीरावरून बोलतात.
जर आरोग्याचे कारण नसेल आणि तुम्ही खुश आहात तर, स्वतः ला बदलण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. अशी आशा करूया की आपल्या समाजात आपल्या हिंदी सिनेमामधे देखिल ही परिस्थिती बदलेल.
टिप्पण्या