Indian Mummy

 हिमाचल प्रदेश मधे जवळ - जवळ १०००० फूट उंचावर एक अशी मम्मी आहे जी पाचशे हून जास्त वर्ष जुनी आहे. आणि ही मम्मी नैसर्गिक रित्या संरक्षित केलेली आहे, कोणत्याही कृत्रिम प्रक्रियेशिवाय. इ. स. १९७५ साली स्पीटी मधे एक भूकंप झाला आणि त्यानंतर एक बऱ्या अवस्थेत असलेले समाधी हाती लागली. आणि त्या समाधीतून काहीतरी आश्चर्यजनक बाहेर निघाले. ग्यू नावाच्या एका गावात एक खोली आहे, जी आहे कदाचित भारतातल्या पहिल्या नैसर्गिकरीत्या संरक्षित केलेल्या मम्मी ची. एका काचेच्या पेटीमधे ठेवलेली ही मम्मी आहे सांघा तेंजिन यांची.

सांघा तेंजिन एक बौद्ध भिक्षू होते. असं बोललं जात की त्यांचा मृत्यू पंधराव्या शतकात झाला होता, जेव्हा ते अंदाजे ४५ वर्षांचे होते. सामान्यतः मृतदेहांना कोणती ना कोणती प्रक्रिया करून संरक्षित केले जाते जसे की एम्बालमिंग. पण असं बोललं जातं की सांघा तेंजिन यांनी स्वतःला मम्मी बनवलं होतं. जपान मधे सोकुशिनबुत्सु नावाची एक शव परीक्षण पद्धती आहे. ही शव परीक्षण पद्धती ११ ते १९ व्या शतकापर्यंत वापरात आणण्यात येत होती. याचे अनुयायी या पद्धतीला मोक्ष प्राप्तीचा मार्ग मानत. या प्रक्रियेतून प्रयत्न केला जायचा की, शरीराला अशा स्थिती मधे घेऊन येता येईल की मृत्यूनंतर देखिल ती संरक्षित राहील.

या प्रक्रियेसाठी खूप वर्षांचा कालावधी लागायचा. असं म्हणतात की शरीरातील चरबी कमी करण्यासाठी ते एक विशिष्ठ प्रकारचा आहार स्वीकारायचे, ज्यामधे झाडांपासून मिळणाऱ्या जसं दाने, बियाणे यासारख्या गोष्टी समाविष्ट असायच्या. गहू, बाजरी कीव्हा यासारख्या गोष्टी ज्या शरीरामध्ये चरबी वाढवू शकतात त्या सोडाव्या लागत. कारण जर शरीरात चरबी वाढली तर द्रवपदार्थ वाढतील आणि त्यामुळे मृत्यूनंतर शरीर लवकर विघटित होइल. असं मानलं जातं की, उरुशी नावाच्या झाडांपासून बनवलेला विषारी चहा देखिल या प्रक्रियेमध्ये प्यायला जात होता. हा चहा प्यायल्यानंतर त्या व्यक्तीला उलट्या होऊन शरीरातील सर्व द्रवपदार्थ निघून जायचे. आणि जर शरीरात विष असेल तर किडे, किटाणू शरीरापासून लांब राहायचे. असही बोललं जातं की या प्रक्रिये मागे आणखी एक हेतू होता, ज्यामुळे शरीराच्या आतील अवयव आकाराने लहान होतील आणि त्यामुळे शरीराचे कुजने थोडे कठीण होईल.

असं बोललं जातं की जपान मधे भिक्षू आपल्या शेवटच्या दिवसात स्वतःला एका समाधीत कोंडून घ्यायचे, ज्यामधे एक नळी असायची हवा येण्या - जाण्यासाठी आणि त्यासोबत एक घंटी देखिल. ते रोज ती घंटी एकदा वाजवत असत त्यावरून बाहेरील लोकांना कळत असे की ते जिवंत आहेत, आणि ज्या दिवशी ती घंटी वाजणार नाही त्या दिवशी असे समजले जायचे की ते आता जिवंत नाहीत, मग ती समाधी बंद केली जायची. त्यांच्या मृत्युच्या अंदाजे हजार दिवसानंतर समाधी उघडली जायची, हे बघण्यासाठी की भिक्षू चे शरीर मम्मी झाले आहे की नाही. पण प्रत्येकाला यामधे यश मिळायचे च असे नाही, असे खूप कमी भिक्षू आहेत ज्यांना यामधे यश मिळाले, मुख्यतः जपान मधे. जपान मधे १९ व्या शतकात या प्रक्रियेला बेकायदेशीर घोषित करण्यात आले.

काही वर्षांपूर्वी युनिव्हर्सिटी ऑफ पेंसिलवेनिया चे प्रोफेसर विक्टर मायर आणि त्यांचा संघ ग्यु पोहोचला, सांघा तेंजिन यांच्या मम्मी चे परीक्षण करण्यासाठी. त्यांना सांघा तेंजिन च्या शरीरात जास्त प्रमाणात नायट्रोजन आढळले जे की त्यांच्या हिशोबाने जास्त काळ उपवास किंव्हा खूप कमी जेवणाचे संकेत दर्शवतात. आणि असेही होऊ शकते की सांघा तेंजिनने सोकुशिनबुत्सु सारख्या प्रक्रियेचे अनुसरण केले असावे. आणि हे देखिल की स्पीटी सारख्या ठिकाण ची हवा आणि थंड वातावरण शरीराच्या संरक्षणासाठी मदतीचे ठरले असेल. ही मम्मी इतर मम्मी सारखी आडवी नाही तर बसलेल्या योग अवस्थेत आहे, आणि सांघा तेंजिन यांच्या गळ्याभोवती एक मेडिटेशन बेल्ट आहे, त्यांच्या मेडिटेशन साठी. एवढ्या वर्षांनंतर ही त्यांचे दाट अजूनही स्पष्ट दिसतात एवढच नाही तर त्यांचे केस आणि नखे देखिल अजूनही संरक्षित आहेत.

लोकसाहित्यात असं मानलं जातं की, ग्यू गावावर विंचुंची पीडा आली होती आणि गावाला वाचवण्यासाठी सांघा तेंजिन ने स्वतःला मम्मी बनून घेण्याचा निर्णय घेतला, लोक असंही म्हणतात की त्यानंतर त्यांचं गाव विंचू पासून मुक्त झाले. आता सांघा तेंजिन यांना ग्यू गावात आदर आणि श्रध्देने पुजले जाते.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट