फटाक्यांवरची बंदी, परिणाम चांगले की वाईट?
फटाके न लावल्याने नक्कीच वातावरणाला खूप फायदे होतील हे तर नक्की पण या निर्णयाचा कोणावर आणि कसा परिणाम होइल याचा आपण विचार ही केला नाही बहुतेक.
आठ लाख नोकऱ्या या एका निर्णयामुळे धोक्यात आल्या आहेत. असं नाही की फटाक्यांच्या बंदीचा निर्णय चुकीचा आहे किंवा तो घ्यायला नको होता, परंतु त्यासाठी थोडसं वेळेचं व्यवस्थापन गरगेचं होतं.
कारण हा निर्णय अगदीच दिवाळीच्या तोंडावर घेण्यात आला, आणि या गोष्टीची पूर्व सूचना कामगार आणि उत्पादकांना ही देण्यात आली नव्हती त्यामुळेच आज ही परिस्थिती उद्भवली आहे.
उत्पादकांना या गोष्टीची काहीच कल्पना नसल्याने सगळा माल अगोदरच तयार झाला होता. आणि आता त्याचे काय करायचे हा खूप मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे आठशे कोटींचा तोटा सहन करावा लागणार आहे.
सिवाकासी हे तामिळनाडू मधले एक शहर आहे जे फटाक्यांच्या उत्पादनाची राजधानी मानले जाते. पण या वर्षी उत्पादन होऊन देखिल बंदी असल्याने ते फटाके विकता येणार नाहीत.
फटाके विकत घेणे किंव्हा वाजवण्याला समर्थन करणे चुकीचेच आहे, परंतु हा निर्णय घेण्याची जी वेळ होती ती नक्कीच चुकीची होती. आज आपण इथे उत्सव साजरा करू, आनंद लुटू, दिवे लावू आणि तिकडे कोणाच्या तरी घरी अंधार असेल.
टिप्पण्या