काही महत्वाच्या गोष्टी ज्या आपण लाॅकडाऊन मधे शिकलो.

 या अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण लॉकडाऊन मधे शिकलो, किंव्हा आपण असं म्हणू की परिस्थितीमुळे आपल्या नजरेसमोर आल्या. ज्या गोष्टींचा कदाचित आपण कधी विचारही केला नसेल की, खरच या गोष्टी शक्य आहेत, किंव्हा तसं करण्याचा प्रयत्न देखिल करण्यात आला नाही. 

आपल्याला सगळ्यानाच ठाऊक आहे की, अशी परिस्थिती कधी आली नव्हती आणि भविष्यात कधी येऊ नये. हा काळ सगळ्यांसाठीच खूप कठीण होता, प्रत्येक जण स्वतःची लढाई लढत होते त्याची कारणं मात्र वेगळी होती, मानसिक, शारीरिक प्रत्येक जन आतल्या आत लढत होता.

पण सगळ्याच गोष्टी वाईट झाल्या असं नाही किंवा चांगल्या गोष्टी घडण्यासाठी असं काहीतरी घडलं पाहिजे असं म्हणणं ही अगदीच चुकीचं ठरेल. पण खरच या इतक्या वाईट परिस्थितीतही ज्या गोष्टी आपल्या नजरेसमोर आल्या आहेत त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही.

आपल्या देशातील असे लोक ज्यांचे वेतन सर्वात कमी आहे, तेच लोक आपल्या देशाला कार्यरत ठेऊ शकतात. हे लोक या देशाचा असा पाया आहेत की, ज्यांच्या शिवाय आपल्या देशाचा पाया ढासळू शकतो. आणि याचे जिवंत उदाहरण आपण सगळ्यांनीच पाहिले आहे.

दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा वर्षानुवर्षे चालत आलेला सगळ्यात गंभीर प्रश्न म्हणजे प्रदूषण. मग ते वायुप्रदूषण असो जल प्रदूषण असो किंवा ध्वनिप्रदूषण, कोणत्याही प्रकारचे. एवढे वर्ष इतक्या देशातील लोक एवढे प्रयत्न करत आहेत हे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी, त्यामधे काही प्रयोग सफल झाले, पण यश तेवढ्या प्रमाणात हाती नाही आले. 

पण लॉकडाऊन मधे ही गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली की जर आपण ठरवले तर, प्रदूषण नक्की नियंत्रणात आणता येऊ शकते, मग ते कोणत्याही प्रकारचे असले तरीही.

आणखी एक महत्त्वाची बाब अशी की, जर आपल्या समाजातील किंव्हा देशातील असे लोक ज्यांना काही विशेषाधिकार आहेत किंव्हा विशेष हक्क आहेत अशा लोकांनी जर मूलभूत गरजां व्यतिरिक्त खरेदी करणं सोडलं किंव्हा त्यांना अशा गोष्टी विकणं जर बंद केलं तर आपली अर्थव्यवस्था ढासळू शकते. 

मान्य आहे की अर्थव्यवस्था धासळण्याठी आणखीही खूप गोष्टी जबाबदार असू शकतात, पण हे देखिल महत्वाचे कारण आपण मानुच शकतो.

जे काही झाले त्यामधे खूप वाईट गोष्टी झाल्या, कोणाचे लोक दुरावले, काही लोक बेरोजगार झाले पण शारीरिक आणि मानसिक रित्या स्वतःला सांभाळणे, स्वतःची काळजी घेणे किती गरजेचे आहे तेदेखील समजले.


 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट