दिवाळीमधे फटाके न वाजवण्याचे कारण काय आहे नक्की?

लवकरच थंडी पडायला सुरुवात होईल आणि थंडीसोबतच येईल सर्दी आणि खोकला ज्यापासून आपल्याला दूर राहायचे किंव्हा आपण असं म्हणू की, त्यापासून आपण स्वतःला दूर ठेवायचे आहे. आता प्रश्न असा आहे की थंडी चा आणि दिवाळीत फटाके न फोडण्याचा काय संबंध? तर तेच थोड सोप्प्या शब्दात सांगायचा प्रयत्न करेन.

जसे की आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे की, भारतात कारोना पासून बरे होण्याची संख्या इतर देशांच्या तुलनेने जास्त आहे, पण ही संख्या लवकरच कमी होण्याची भीती आहे आणि कारण आहे थंडी. 

कारण तशी भीती वाटण्याची कारणं देखिल आहेत, आतापर्यंत काय होत होतं की, उन्हाळा चालू होता त्यामुळे वातावरण ही तसेच होते. उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती शिंकली किंव्हा खोकली तर त्याच्या तोंडामार्फत आणि नाकामार्फत जे कण बाहेर पडतात ते, एखाद्या जागेवर जाऊन बसतात आणि त्याजागी पुन्हा कोणाचा हात लागला तर संसर्ग होण्याची शक्यता आहे. आणि उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे त्यांचे बाष्पीभवन होत होते किंव्हा ते उष्णतेमुळे जास्त काळ तिथे टिकत नव्हते. 

पण त्याउलट आता हिवाळा चालू होणार आणि हवेतील तापमान कमी होणार, उष्णता कमी होणार आणि त्यामुळे कॉरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता टाळता येणार नाही. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे जशी आपण मे महिन्यात घेत होतो तशी काळजी.

कारोनाचा धोका जास्तीत जास्त अशा लोकांना आहे ज्यांचे वय जास्त आहे, रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे आणि ज्यांना फुफ्फुसांचा आजार आहे. 

हिवाळ्यामध्ये थंडी असणार, ज्यामुळे हा धोका आणखी वाढला आहे. दिवाळीमधे फटाक्यांमुळे जे वायुप्रदूषण होणार आहे त्यामुळे अशा लोकांना ज्यांना फुफ्फुसांच्या आजाराचा त्रास आहे, त्यांना आणखी त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर ज्यांना कोरोना होऊन गेला आहे मात्र त्यांचे फुफ्फुस तितकेसे निरोगी नाही, त्यांना या वायुप्रदूषणामुळे भविष्यात ही त्रास होण्याची शक्यता आहे.

जर हवेत प्रदूषण वाढले तर, श्वास घेण्यासाठी देखिल त्रास होणार आणि याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होणार. पण राजस्थान सरकारने यासाठी एक निर्णय घेतला आहे की, कोरोना च्या रुग्णांच्या भल्यासाठी फटाके विकणे आणि फटाके वाजवणे या दोन्हींवर बंदी घालण्यात आली आहे.

वायू प्रदूषण कसे कमी करता येईल हे फक्त आणि फक्त आपल्या हातात आहे, जोपर्यंत कोरोना ची लस शोधून काढत नाही तोपर्यंत ही लढाई संपणार नाही पण तोपर्यंत आपल्याला जास्त खबरदारी घेणं गरजेचं आहे, जशी खबरदारी आपण सुरुवातीला घेत होतो. 

आपण जेवढे बेजबाबदार पणे वागू, तेवढेच रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका जास्त आहे, कोरोना ची दुसरी लाट येण्याची भीती जास्त आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे, तेव्हाच आपण ही लढाई जिंकू शकतो.


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट