Friend
कोणाची मदत घेऊ, कोणाला सांगू काहीच कळत नव्हतं. पण शांत बसून पण चालणार नव्हतं काहीतरी हालचाल करायलाच हवी. जे घडल होतं ते अगदीच अनपेक्षित होतं माझ्यासाठी. माझ्या सोबत जे घडलं होतं ते सांगण्यासाठी मला कोणीतरी हवं होतं आणि त्याही पेक्षा जास्त त्यावर विश्वास ठेवणारं.
या अशा परिस्थिती मध्ये काय करायचं, कोणाची मदत घ्यायची, कोणाशी बोललं पाहिजे असलं काही शिकवलच जात नाही आपल्याला. पण luckily आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असा एक तरी friend असतो ज्याच्यावर आपण स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेऊ शकतो. आणि माझ्या ही आयुष्यात अशी एक मैत्रीण होती.
मला एका गोष्टीचं नेहमीच नवल वाटत आलं आहे की, आपण आपल्या आई - वडिलांसोबत सगळ्या गोष्टी का share करु शकत नाही यात त्यांची चूक आहे की आपली.
या अशा परिस्थितीत सुद्धा जिथे माझी काहीच चूक नाही, उलट जो अन्याय झाला आहे तो माझ्या सोबत. तरीही मी माझ्या आई - वडिलां ऐवजी मैत्रिणी च नाव डोळ्यासमोर यावं.
पण सद्ध्या तो मुद्दा महत्वाचा नव्हता, त्याही पेक्षा खूप जास्त important काहीतरी मला नीस्तरायचं बाकी होतं, म्हणूनच मी थेट स्नेहा कडे गेली आम्ही बाहेरच भेटायचं ठरवलं मी तिला सारं सविस्तर सांगितलं, तीही थोडी भांबावून गेली थोड्या वेळासाठी तिलाही समजेना काय बोलावं आणि काय करावं. पण पुढच्या च क्षणाला ती मला म्हणाली आपण अगोदर तुझ्या घरी जाऊन काका - काकीला ही गोष्ट सांगू आणि पोलिस स्टेशन ला जाऊ.
मला तर कळत च नव्हतं नक्की काय चालू होतं माझ्या आयुष्यात इतक्या पट - पट गोष्टी घडत होत्या कसली काय सवड च मिळत नव्हती विचार करायला.
मग तिथून आम्ही माझ्या घरी गेलो आणि आई - बाबांनी अनपेक्षित रित्या प्रतिक्रिया दिली, त्यांना वाईट वाटले की आपल्या मुली सोबत इतकं सगळं घडून गेलं तरी आपल्याला त्याचा अंदाज देखील आला नाही, हे सगळं ती एकटीने सहन करत राहिली.
त्यांची ती reaction माझ्यासाठी खूपच अनपेक्षित होती, त्या सगळ्या परिस्थितीत सुद्धा मला जाणवलं की आपले माणसांच्या बाबतीतले अंदाज किती चुकतात.
बाबा मला पोलिस स्टेशन ला घेऊन गेले....
खूप विचित्र वातावरण होतं तिथे अगदीच गांगरून गेली होती 22 वर्षांची मी, 5 वर्षाच्या मुलीसारखी बाबांचा हात पकडुन चालू लागली.
पोलिसांनी आम्हाला बसायला सांगितले आणि तक्रार काय आहे ते विचारले, मला ठाऊक होते सगळे माझ्या सोबत असले तरी हिम्मत करून आता पुढचं सगळं मला च बोलायचं आहे जे काही झालं होतं ते सांगणं भाग च होतं.
माझं नाव आणि तक्रार लिहून घेण्यात आली, मग मी जे काही घडलं होतं ते सांगायला सुरुवात केली.
मला माझ्या friend phone आला त्यांनी नवीन रूम घेतली होती बघायला येणार का विचारलं, मी ही हो म्हटलं मला त्यात काहीच odd नाही वाटलं. आम्ही रूम वर गेलो मस्त गप्पा मारत बसलो होतो आणि अचानक खूप विचित्र स्पर्श झाला खूप घाणेरडा मला काही सुचेनास झालं अजून जवळ येत होता तो हात मी विरोध केला नकार देखील व्यक्त केला मात्र त्याचा काहीच परिणाम होताना दिसत नव्हता.
माझ्या मर्जी शिवाय मला कोणीतरी हात लावताय ही कल्पना च असहाय झाली मला. मला सेल्फ डिफेन्स येतो त्यामुळे त्याक्षणी तिथून कसे निस्तयचे ते मी ठरवले आणि तसे केले ही. या सगळ्या प्रकारात मलाही दुखापत झाली पण तिथून पळत येऊन थेट मी घरीच थांबले तिथून येताना मी कशी आले रस्ते कसे ओलांडले माझ मला च आठवत नाही, पण जेव्हा घरी आले शांत बसले तेव्हा जो प्रकार घडला होता तो नक्की काय होता त्याचे काही इक्युएशन च लागत नव्हते. मग मी ठरवलं जे काही घडलय त्या बद्दल बोलायचं च काहीही झालं तरी. म्हणून मी इथे आली आहे.
पोलिसांनी सगळी हकीगत ऐकून घेतली आणि मग माझ्या बाबांकडे वळून म्हणाले; पाहिलत ही आजकालची मुलं, आता तुम्ही च सांगा काय गरज होती तुमच्या मुलीला जायची, त्याने बोलावलं आणि ही गेली.
मला तरी वाटलं च होतं की हा गैरसमज नक्की होणार, म्हणून म्हंटल एवढी हिम्मत केली च आहे तर आणखी थोडी करूया.
Sir पहिली गोष्ट म्हणजे मला माझ्या frnd वर विश्वास होता म्हणून मी तिथे गेली होती, मी विश्वास ठेवला यात माझी तर काही चूक नाही ना.....
आणि दुसरी गोष्ट त्याने नव्हत बोलावलं मला तिने बोलावलं होतं... Friend ने म्हणजे मैत्रिणीने बोलावलं होतं मला....
टिप्पण्या