Part- 2


सूरज    : काही नाही गं ! मी यांना प्रिया बद्दल सांगत होतो, प्रियाचं असं म्हणणं आहे कि, 'निखिल' जो तुझा आणि                प्रियाचा मित्र आहे, तो आणि सानवी Relationship मध्ये आहेत. 

सानवी  : काय??? ok seriously कोण आहे कोण हा निखिल? आणि त्याचा आणि माझा काय संबंध? तो काळा                  कि गोरा ते हि मला माहिती नाही. कोण आहे कोण हा?


रिमा     : तो आमचा college friend आहे. 

सानवी  : मी ओळखते का त्याला किव्हा तो मला?

रिमा     : तू त्याला नाही ओळखत पण त्याने तुला पाहिलंय एक-दोनदा आमच्या सोबत. Just like a 
             common friend.

सूरज    : तो त्यादिवशी प्रिया सोबत बोलत होता तुझ्याबद्दल, तुझ्याशी ओळख करून देण्यासंबंधी. 


सानवी  : मग या सगळ्या गोष्टी अशा विचित्र पद्धतीने का समोर येतायत माझ्या. 


सूरज    : तेच तर केलंय प्रियाने, तिच्यामुळेच हे सगळं अशा पद्धतीने तुझ्या समोर येतायं. 


श्रेया      : पण मग सानवी च का? तिचं च का नाव घेतलं प्रियाने, हे सगळं Relationship and all?


जान्हवी : तेच तर, तिचा तर काही संबंध देखिल नाही आता प्रियाशी मग का असं. 


सूरज    : तेच तर मला देखिल कळत नाहीए, तिला जर खरं सांगायचं नसेल तर नव्हतं सांगायचं पण असं खोटं 
              काहीतरी ती का बोलतेय तेच कळत नाहीए. 


रिमा     : कारण निखिल ला सानवी आवडते, आणि प्रियाला निखिल....... 



टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट