Equal-Equal

Equal-Equal

दोन व्यक्ती जेव्हा एखाद्या नात्याची सुरुवात करत असतात तेव्हा साहजिकच ते नातं टिकवण्यासाठी Equal-Equal प्रयत्न कारणं गरजेचं असतं. 

मग जर एखाद्या नात्याची सुरुवात करण्यासाठी पुढाकार 'तीने' घेतला तर काय हरकत आहे. आणि जर नवरा-बायकोचं नातं हे बरोबरीचं असेल contribution, efforts जर same असतील तर मग, त्या मुलीनंच का आपलं घर, आई-वडील सोडून यायचं. 

जर नातं Equal-Equal असेल तर का नेहमी सगळ्या जबाबदाऱ्या 'त्या' च्याच खांद्यावर. फक्त restaurant मध्ये जाऊन bill equal divide केलं म्हणून काही नात्याचं contribution देखिल equal divide झालं असं होतं नाही. त्याच्या डोळ्यात जर पाणी आलं, तर त्याचं दुःख तीलाही जाणवलं पाहिजे. नाहीतर मग ते emotions चं नातं कसलं ती तर एक practical deal होईल. 

मान्य आहे सगळ्यांच्या case मध्ये same situation नसते, तरीही पुन्हा एकदा पडताळून पाहा आपलं नातं किती Equal-Equal आहे ते. 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट