स्वीकार

स्वीकार 

               जे कायद्याने मान्य झालयं ते खरच सगळ्यांना मान्य झालय का? हाच प्रश्न तुमच्या-आमच्या सारख्या तरुणांना पड़ला असेल. एखाद्या व्यक्तीची मनःस्थिती समजून घ्यायची असेल तर, 'त्या व्यक्तीच्या जागी जर आपण असतो तर काय केले असते' असा प्रश्न स्वतःला विचारावा लागतो. 
                आपल्या मनात असलेल्या भावना आपण बदलू शकत नाही किंवा त्यावर आपले कोणतेही नियंत्रण नसते, अशावेळी मनाची अवस्था किती बिकट होत असेल याची कल्पना देखिल करता येणार नाही.
स्वतःबद्दलची एखादी गोष्ट अवगत होणे आणि ते ही हे की, आपण तृतीयपंथी आहोत मनाने, शरीराने कसेही.                    आपण चार-चौघांसारखे नाही आहोत आपल्या आवडी-निवडी वेगळ्या आहेत, आपण स्वतःच वेगळे आहोत, आपण जे स्वतःला समजत होतो ते नाही आहोत, या गोष्टीचा स्वीकार करने जास्त महत्त्वाचे आहे आणि तेदेखिल अभिमानाने. आपण आपल्या मनाची लढाई जेव्हा जिंकू तेव्हाच तर खरी जगाशी, समाजाशी लढायची हिम्मत येईल. 
            आम्हीही माणूसच आहोत या गोष्टीची जाणीव समाजाला करून देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. समाजात असंख्य अडथळ्यांना सामोरे जावे लागते पावला-पावला वर लहान-मोठी संकटे उभी ठाकलेली असतात मात्र त्या संकटांना तोंड देऊन आपला उदरनिर्वाह करणे भाग असते. 
                 आपल्या देशात व्यक्ती स्वातंत्र्य आहे, बोलण्याचे, विचाराचे, पेहरावाचे स्वातंत्र्य....... खरचं आहे का हे सगळे?
                एखादी व्यक्ती जर आपल्याला आवडू लागली तर, त्या भावनांवर आपले नियंत्रण नसते मग ती स्त्री असो वा पुरुष. आपल्याला वाटणाऱ्या भावना या खऱ्या असतात त्या कोणाच्याही हस्तक्षेपाने बदलू शकत नाहीत, परंतु या गोष्टी समजावणे तितकेच कठीण आहे. 
                 कायद्याची लढाई तर पार पडली, आता मनाची ही जिंकूच.     

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट