रक्षा(बंधन)
रक्षा(बंधन)
भाऊ म्हटलं की उदाहरणं डोळ्यासमोर येतात ती लक्ष्मण अणि कृष्णासारख्या भावांची, एका भावाने भावाची साथ सोडली नाही आणि दुसऱ्या भावाने आपल्या बहिनीचे रक्षण केले.
पण आपल्याला कधीही कुठेही शकुनी आणि रावणाचे उदाहरण दिलेले आढळत नाही, नेहमीच त्यांच्या चुकीच्या वागण्याचा आणि दुष्कृत्यांचा गवगवा केला गेला. परंतु रामायण आणि महाभारत का घडले, याचे मुख्य कारण शकुनी आणि रावणच आहेत.
शकुनीला आपल्या अत्यंत प्रिय बहिणीचे दुःख बघवले नाही, ज्या बहिणीची कोणतीही इच्छा व्यक्त होण्याआधी पूर्ण झाली होती, त्या बहिणीला जेव्हा अंधळेपणाचा श्राप स्विकारावा लागला तेव्हा एका भावाची विचारशक्ती खुंटली.
शकुनीने जे केले ते चुकीचेच होते यात काही शंकाच नाही, मात्र त्यामागे जे कारण होते ते चुकीचे कधीच नव्हते. बहिणीवरचे निस्वार्थ प्रेम हा एकच हेतु त्यामागे होता.
तसेच काहीसे रावणाचे ही झाले, लक्ष्मणाने शुर्पनखेचे नाक कापले हे ऐकल्यावर रावण संतापला आपल्या बहिणीचा इतका मोठा अपमान त्याला सहन झाला नाही आणि त्याने सीतेचे अपहरन केले, मात्र त्या कालावधीत देखिल सीतेला स्पर्श ही न करणारा रावण, बहिणीच्या आंधळ्या प्रेमात बुडून केलेल्या गुन्ह्यामुळे त्याचा अंत झाला.
मात्र महाभारतातील पाच पांडवांनी जेव्हा द्रौपदीला पणाला लावले आणि रामाने सीतेला अग्निपरीक्षा देण्यास सांगितली ते ही तितकेच चुकीचे आहे.
टिप्पण्या