दत्तक
दत्तक
एखाद्या मुलाला किंवा मुलीला जेव्हा दत्तक घेतले जाते तेव्हा, फ़क्त अणि फ़क्त त्या मुलाच्या हीताचा विचार केला जातो की त्याचे भविष्य सुधरेल त्याला एक चांगले कुटुंब मिळेल त्यालाही त्याच्या हक्काची माणसे मिळतील अणि तसे होते देखील, पण मग त्यापुढे काय?
ज्या दिवशी त्या मुलाला हे कळते की आपण ज्यांना आपले जन्मदाते मानत आहोत ते खर तर आपले कोणीच नाहीत त्या एका क्षणामध्ये सगळे संपूण जाते आणि तसे नाही झाले तर एक उपकाराची भावना मात्र येते. या एका सत्यानंतर खरच ते नाते जसे होते तसेच राहते का?
चुक ही खर तर कोणाचीच नसते मग तरीही का एक अपराधी भावना मनात दोकावून जाते, सत्य न सांगण्यामागे काहीतरी कारण आहे हे माहिती असून देखिल मन का मानत नाही, कालपर्यंत जे आपले सर्वस्व होते ते आज आपले कोण आहेत हे देखिल कळेनासे होते.
मनात असंख्य प्रश्न गर्दी करून बसलेले असतात आणि त्यांना बाहेर पडण्यासाठी वाव देखिल नसतो. यांनी आपल्याला का दत्तक घेतले असेल? दया आली असेल म्हणून की आणखी काही कारण असेल? आपलं जग आपल्या समोर उलटं सुलटं होताना दिसतय पन आपन काहीच करू शकत नाही, अचानक ओळखीचे चेहरे अनोळखी वाटू लागतात.
पण प्रश्नांची उत्तरे मिळो अगर न मिळो जर प्रेम खरं असेल तर रक्ताची नाती देखिल फिकी पडतात. आपल्याला मिळालेले प्रेम हे या सत्याहुनही अधिक खरे आहे, याची खात्री जेव्हा पटते तेव्हा कोणतीच गोष्ट त्यांना वेगळ करू शकत नाही.
टिप्पण्या