वाचक आणि वाचन खरंच कमी झालंय?

वाचक आणि वाचन खरंच कमी झालंय?



वाचक आणि वाचन कमी झाले आहेत हे जरी खरे असले तरी, त्यामागे करणेही तशीच आहेत. जसे मोबाइल वापरण्याचे वाढते प्रमाण, एखाद्या गोष्टीचा वापर कसा करायचा हे पूर्णतः आपल्यावर अवलंबून असते. नाण्याला जशा दोन बाजू असतात, तसेच मोबाईलचे चांगले आणि वाईट, उपयोग आणि दुरुपयोग हि असतात.
आणखी एक कारण म्हणजे आपले हे धावते जग ज्यामध्ये आपल्याला आपल्यासाठी वेळ उरलेला नाही. वाचन म्हणजे फावल्या वेळातला टाईमपास नाही हे समजून घेणे गरजेचे आहे, तीही एक कला आहे. त्यासाठी आपलं मन एकाग्र करून संपूर्ण लक्ष त्या वाचनामध्ये ओतावं लागतं. आजच्या आपल्या या धावपळीच्या आयुष्यात तेवढा वेळ मिळणं कदाचित अशक्यच आहे.
आणखी त्यात भर म्हणून कि काय, आपल्या आजच्या पिढीला वाचनाची आवड म्हणजे काय तेच ठाऊक नाही. आजच्या फास्टफूड च्या जगात जसं आपल्याला सगळं झटपट हवं असतं, तशीच प्रत्येक गोष्ट मिळावी अशी अपेक्षा असते. एखादी गोष्ट मेहनत करून थोडा वेळ देऊन मिळाल्या वर त्या गोष्टीची चव वेगळीच असते हे आम्हाला ठाऊक च  नाही. वाचनाच्या बाबतीतही तसेच असते, थोडा वेळ देऊन त्या गोष्टीची खरी मजा घेता येते.
जर एखाद्या व्यक्तीला खरच हि आवड जोपासावी असे वाटत असेल तर त्यासाठी ती व्यक्ती वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब करते. जसे कि स्मार्टफोन च्या साहाय्याने अनेक गोष्टी उपलब्ध आहेत, ज्यामध्ये आपल्याला पुस्तक विकत न घेता देखील ते वाचणे अगदी सहज सोप्पे आहे जसे कि एखाद्या गोष्टी ची  ऑडिओ फाईल आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ती ऐकायची. बाजारात किंडल नावाचं एक साधन संच (गॅजेट) उपलब्ध आहे त्यामार्फत आपण वेगवेगळी पुस्तके वाचू शकतो तेही एकाच गॅजेट मध्ये.
कदाचित याच कारणांमुळे पुस्तक विकत घेण्याऐवजी ते मोबाईल मध्ये किव्हा एखाद्या अँपमध्ये वाचणे जास्त सोईचे वाटते, कदाचित ते योग्य हि असू शकते कारण काळाप्रमाणे बदलणे सगळ्यांसाठीच फायद्याचे आहे.
वाचक आणि वाचन जर वाढवायचे असेल तर त्याची संपूर्णतः जबाबदारी हि प्रत्येक स्वतंत्र व्यक्तीची आहे. वाचन करणे हे महत्त्वाचे आहे मग ते कोणत्याही मार्गाने असो, कोणत्याही पद्धतीने असो जुन्या किव्हा नवीन. वाचनाची आवड निर्माण होणे हे महत्वाचे आहे.
वाचनाची आवड कमी होण्याला आणखी एक कारण आहे ते म्हणजे त्या भाषेवरील प्रेम. ती भाषा जाणून घेण्यासाठी त्याबद्दल वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी त्याबद्दल प्रेम असणे हि तितकेच महत्त्वाचे आहे.
तसेच आजच्या पिढीला मिळणार कमी-जास्त प्रमाणातला वेळ व त्याचे नियोजन कसे करावे, कोणत्या गोष्टींमध्ये आपला वेळ गुंतवावा हेच कळेनासे झाले आहे. मग तो वेळ ते मोबाईल, टीव्ही, इंटरनेट या सगळ्या गोष्टींमध्ये वाया घालवतात.
जर ते त्यांचा वेळ या सगळ्या गोष्टींबरोबर जास्त घालवत असतील तर त्याच गोष्टीच्या साहाय्याने त्यांची वाचनाची आवड वाढवायला हवी.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट