व्हॉट्सॲपच्या अद्ययावत गोपनीयता धोरणाचा नेमका अर्थ काय आहे?

व्हॉट्सॲपने आपले गोपनीयता धोरण आणि सेवा अटी अद्यायावत केल्या आणि वापरकर्त्यांच्या डेटाला अन्य फेसबुक-मालकीच्या आणि तृतीय-पक्ष अ‍ॅप्ससह कसे सामायिक करेल याबद्दल निर्णय घेतले आहेत. 

त्यासाठी एक अट देखिल आहे, वापरकर्त्याने फेसबुकबरोबर डेटा सामायिक करण्यास नकार दिला तर त्यांना व्हॉट्सअ‍ॅप सोडावे लागेल. नवीन सेवा अटी 8 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. 

आपले व्हॉट्सॲप वरील स्टेटस, ग्रुपचे नाव, आयकॉन्स, आपण ऑनलाइन आहोत की नाही या सगळ्या गोष्टी तर अगोदर कळतच होत्या. या पलीकडे आता व्हॉट्सॲप व्यवहार प्रक्रिया शिपमेंट डेटासह नवीन पेमेंट वैशिष्ट्यावरील डेटा संकलित करेल. 

यासोबत लोकेशन, डिव्हाइस मॉडेल, ऑपरेटिंग सिस्टम, बॅटरी लेव्हल आणि ब्राउझर तपशील देखील संकलित आणि सामायिक करेल. जुलै महिन्यातसुद्धा व्हॉट्सॲपने आपल्या वापरकर्त्यांना युझर डेटा सामायिक करण्याच्या संदर्भात निवड दिली होती. 

अटी आणि गोपनीयता धोरण स्वीकारणार्‍या वापरकर्त्यांकडे ही निवड करण्यासाठी अतिरिक्त तीस दिवसांचा कालावधी असेल, असे त्यात नमूद केले. डिजिटल लिबर्टीज संस्थेच्या इंटरनेट फ्रीडम फाउंडेशनचे कार्यकारी संचालक अपार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार गोपनीयता धोरणामध्ये स्पष्टतेचा अभाव आहे.

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामवरील डेटा कसा एकत्रित केला जात आहे आणि तो कोणाकडे उपलब्ध करुन दिला जात आहे यावर प्रकाश टाकण्यात अजूनतरी अपयश हाती आले आहे. व्हॉट्सॲप ने आत्तातरी वापरकर्त्यांना निवडीचा पर्याय दिलेला नाही, त्यामुळे जर तुम्हाला व्हॉट्सॲप वापरायचे असल्यास या नियमांचा स्वीकार करावाच लागेल.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट