आयुष्याच्या शाळेत तुम्हीही या गोष्टी शिकले आहात का?

जीवन हा सतत शिकण्याचा अनुभव असतो. यातील काही धडे अनुभवातून शिकतो, तर काही आहेत जे आपण इतरांना पाहून शिकतो तर काही पुस्तकांमधून शिकतो. परंतु पुस्तकी ज्ञानापेक्षा जो अनुभव आपल्याला आयुष्य शिकवते, ते कधीही न विसरण्यासारखे असतात.

१. नेहमी असे म्हंटले जाते की आपले खाजगी आयुष्य आणि आपले व्यावसायिक जीवन दोन्ही वेगवेगळे ठेवावे. ते जर एकत्र झाले तर सगळीच गडबड होऊन बसते. मात्र कामाच्या बाबतीत कोणीच आपला मित्र नसतो, त्यामुळे डोळे झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा सगळ्या गोष्टी कागदोपत्री असलेल्याच बऱ्या.

२. कोणतीच गोष्ट जास्त काळ लपून राहू शकत नाही. मग ते कामाच्या बाबतीत दिलेले आश्वासन असो किंवा एखादी खोटी माहिती. ती कधी ना कधी समोर येईलच मात्र तेव्हा तुम्ही तुमची विश्वास ठेवण्याची पात्रता गमावून बसलेले असाल.

३. आयुष्यात काहीच फुकट मिळत नाही, प्रत्येक गोष्टीची किंमत ही मोजाविच लागते. जर काही हवे असेल तर त्यासाठी मेहनत घ्यावीच लागेल, सोप्पे काहीच नाही यशस्वी होण्याच्या मार्गाचा 'शॉर्ट कट' अजून बनलेलाच नाही. एकुलता एकच मार्ग आहे, 'मेहनत करा पुढे जा.'

४. प्रत्येकाने आपल्याशी सहमत असायला हवे, आपल्यासारखे असायला हवे असा हट्ट अजिबात ठेऊ नका कारण तसे असणे गरजेचे नाही. आपला मुद्दा जर योग्य असेल तर एकट्याने आवाज उठवा आणि आपल्या मुद्द्याशी ठाम रहा. 

५. आपल्याला पाहिजे असलेले नेहमी आपल्याला मिळत नाही. आपण कितीही काळजीपूर्वक योजना आखलीत किंवा कितीही कठोर परिश्रम घेतले तरी त्याचा काही उपयोग होत नाही, काहीवेळा गोष्टी आपल्याला पाहिजे त्या मार्गाने घडत नाहीत, पण आयुष्य असेच असते आश्चर्यांनी भरलेले.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट