इलोन मस्क कोण आहे? जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी.

जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या रोजच्या क्रमवारीत असलेल्या 'ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या' म्हणण्यानुसार, दक्षिण आफ्रिकेमध्ये जन्मलेला अमेरिकन उद्योजक एलोन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. त्यांची संपत्ती १९५ अब्ज डॉलर्स इतकी आहे.

२००८ मध्ये, टेस्ला आणि स्पेसएक्स या दोन्ही कंपन्या दिवाळखोरीच्या मार्गावर होत्या. दोन्हीपैकी कुठल्याही कंपनीची गुंतवणूक आणि बचत करण्यासाठी मस्क यांच्याजवळ फक्त ४० मिलियन डॉलर होते. त्यांनी जोखीम घेतली, पैशाचे विभाजन केले आणि दोन्ही कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली.

एलोन मस्क यांची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे त्यांची विचारशील दृष्टी. ते नेहमी एक भविष्यवादी दृष्टीकोन ठेऊन जगापेक्षा १०-२० वर्षे पुढे असतात. स्पेसएक्स आणि टेस्ला या कंपन्या खरोखरच हे प्रदर्शित करतात. आपण सर्वांनी हा गुण समाविष्ट केला पाहिजे.

एलोन मस्क हे आठवड्यातून ८० तासांपेक्षा जास्त काळ काम करतात. जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून घोषित झाल्यानंतर त्यांनी '' बॅक टू वर्क '' असे ट्विट केले.  जर असे कठोर परिश्रम करण्याची ताकद असेल तर यश हे नक्की मिळेल.

त्यांच्या ट्विटर प्रोफाइलवरील पिन केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी स्पष्ट केले की, ते एवढ्या पैशांचे नेमके काय करणार आहेत. 'सुमारे अर्धा पैसा पृथ्वीवरील समस्या सोडवण्यात मदत करण्यासाठी वापरला जाईल, आणि अर्धा पैसा मंगळावर स्वावलंबी शहर स्थापित करण्यात मदत करण्यासाठी.'

गेल्या महिन्यात एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, आपल्या संपत्तीचा उपयोग मंगळावर शहर बनविण्यासाठी करायचा आहे, त्याचबरोबर ते असेही म्हणाले की 'मला मंगळावर असलेल्या शहरासाठी जास्तीत जास्त योगदान देण्यास सक्षम व्हायचे आहे.' 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट