पैसे गुंतवायचा विचार करत आहात? त्यापूर्वी काही सूचना जाणून घ्या.

योग्य प्रकारे आणि योग्य ठिकाणी पैसे गुंतवणुकीचे ज्ञान असणे किती गरजेचे आहे, हे कधी कधी वेळ निघून गेल्यानंतर समजते. तशी वेळ तुमच्यावर येऊ नये असे वाटत असेल तर या सूचना नक्की वाचा, आणि त्याचा विचार करूनच मग आपली गुंतवणूक सुरू करा.

विचार करून कृती करावी असे म्हंटले जाते, आणि ते गुंतवणुकीच्या बाबतीत देखिल लागू होते. आपण किती काळ गुंतवणूक करू शकतो याचा विचार करा. म्हणजे अगोदर या गोष्टीचा विचार करा आणि मगच गुंतवणुकीला सुरुवात करा.

आपल्याला ज्या क्षेत्राचे ज्ञान आहे, आपल्याला ज्या गोष्टीबद्दल माहिती आहे, समज आहे अशाच व्यवसायामध्ये गुंतवणूक करा. आपल्याला समजत असलेल्या व्यवसायातच गुंतवणूक करा. आपल्याला ज्या व्यवसायाचे ज्ञानच नाही तिथे पैसे गुंतवणे म्हणजे सगळे व्यर्थ घालवण्यासारखे होईल.

गुंतवणूक करताना पद्धतशीर पणाने करा. कधीही, कसेही, जेव्हा मनात येईल तेव्हा अशी गुंतवणूक फायद्याची नाही. आठवड्यातून, महिन्यातून किंव्हा वर्षातून एकदा अशी गुंतवणूक करा मात्र ते ठरवून करा. पद्धतशीरपणे केलेली गुंतवणूकच योग्य ठरेल.

आपल्या गुंतवणूकीतून आपल्याला खरोखर काय हवे आहे याचा विचार करा, आणि तसा विचार करण्यात काहीच गैर नाही. गुंतवणुकीच्या दृष्टीने आपल्या गरजा काय आहेत आणि आपली जोखीम घेण्याची क्षमता किती आहे हे ठाऊक असणे गरजेचे आहे.

गुंतवणूकीचे निर्णय घेण्यास तुम्ही आनंद घेऊ इच्छित असल्यास आपण वैयक्तिक शेअर्स खरेदी करण्याचा विचार करू शकता, परंतु आपल्याला जोखीम ठाऊक असल्याचे सुनिश्चित करा. आपल्याला आवश्यक गुंतवणूकीच्या प्रकारांबद्दल किंवा आपण कोणत्या गुंतवणूकीसाठी निधी निवडायचा याबद्दल आपल्याला खात्री नसल्यास आर्थिक सल्ला घ्या.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट