५ मोठ्या कंपन्या ज्यावर मुकेश अंबानी यांचा डोळा आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी यांची एकूण मालमत्ता ७८.३ अब्ज डॉलर्स आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कोरोना व्हायरसच्या उद्रेकात अब्जावधींचे नुकसान झाल्यामुळे मुकेश अंबानी यांनी नव्या जोमाने पुनरागमन केले.

१. टिकटाॅक:
    सरकारने चिनी ॲप्सवर बंदी घातल्यामुळे, सध्या चिनी सोशल मीडिया कंपनीला आपला सर्वात मोठा यूजर-बेस गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार असा दावा करण्यात येत आहे की, मुकेश अंबानींची रिलायन्स टिकटाॅक च्या मालकांशी चर्चा करत आहेत.

२. अर्बन लॅडर:
    लोकप्रिय ऑनलाइन फर्निचर डेकाॅर रिटेलर अर्बन लॅडर, रिलायन्स विकत घेण्याच्या तयारीत आहेत. अहवालानुसार, चर्चेचे सकारात्मक परिणाम अपेक्षित आहेत आणि रिलायन्स सुमारे ३० दशलक्ष डॉलर्सचा हा करार पूर्ण करेल.

३. झिवामे:
    ई-कॉमर्समधे आपले वर्चस्व वाढवण्याच्या उद्देशाने रिलायन्सची सहाय्यक कंपनी रिलायन्स ब्रँड आता झिवामे मधील काही शेअर्स विकत घेण्याच्या तयारीत आहे. रॉनी स्क्रूवाला यांचा पूर्ण १५ टक्के हिस्सा विकत घेतल्याची माहिती मिळाल्यामुळे रिलायन्स ब्रॅण्ड्स आता कंपनीतील १०० टक्के भागभांडवल खरेदी करणार आहेत. झिवामे मिळवण्यासाठी रिलायन्सकडून १६० दशलक्ष डॉलर्स देण्याची अपेक्षा आहे.

४. फ्युचर रिटेल - बिग बाजार:
    जर अहवालांवर विश्वास ठेवला गेला तर, रिलायन्स सध्या किशोर बियानिंच्या फ्यूचर ग्रुपबरोबर एक मोठा करार करण्याच्या तयारीत आहेत. फ्यूचर ग्रुपचा रिटेल व्यवसाय २४०००-२७००० कोटी रुपयांवर होईल.

५. मिल्कबास्केट:
    ई-रिटेल क्षेत्रातील आणखी एक प्रमुख खेळाडू, मिल्कबास्केट हे देखील रिलायन्सच्या यादीमध्ये असल्याचे म्हटले जाते. अ‍ॅमेझॉन आणि बिगबस्केटशी यापूर्वी चर्चा झाल्याप्रमाणे मिल्कबास्केट हे रिलायन्सकडून अधिक चांगले मूल्य शोधत असल्याचे सांगत आहे, बिगबस्केटच्या १५ दशलक्ष डॉलर्सपेक्षाही जास्त.

   

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट