डी. सी. घोटाळा नक्की काय आहे? जाणून घ्या.
डी. सी. म्हणजेच दिलीप छाब्रिया. दिलीप छाब्रिया हे एक भारतीय कार डिझायनर आहेत आणि डीसी डिझाइनचे संस्थापक. त्यांनी डीसी अवंतीचे डिझाइन आणि निर्मिती केली, जी भारताची पहिली स्पोर्ट्स कार मानली जाते. तर या सगळ्यामधे घोटाळा नक्की काय झाला?
कंपनी त्यांच्या स्वत:च्या बनविलेल्या मोटारींसाठी ग्राहक म्हणून नॉन-बँकिंग फायनान्शिअल कंपन्यांकडून (एनबीएफसी) कर्ज घेतले, आणि त्याची परतफेड देखिल केली नाही. अशी वाहने नंतर ग्राहकांच्या माहितीशिवाय फसव्या मार्गाने वित्तपुरवठा करुन इतर ग्राहकांना विकली गेली.
पोलिसांना असे आढळून आले की, ९० हून जास्त वाहने जी वेग वेगळ्या राज्यांमधून आरटीओत नोंद झाली आहे. या प्रकरणातील तक्रारदार हा तमिळनाडूचा रहिवासी आहे, त्याची डीसी अवंती मशीन आणि क्रमांक तमिळनाडू आणि हरियाणा आरटीओमध्ये देखील नोंदविला गेला आहे.
पोलिसांना असा दाट संशय आहे की, ते या एकाधिक नोंदणी क्रमांकाचा वापर कर्ज घेण्यासाठी आणि त्याची परतफेड न करण्याच्या हेतूने करत आहेत. पण हे सगळे प्रकरण किंव्हा घोटाळा नजरेत आला कसा?
तामिळनाडूमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला जेव्हा वाहतूक पोलिसांनी पकडले आणि चलान कापले त्यावेळी, पोलिसांच्या असे लक्षात आले की त्या वाहनाची नोंदणी हरियाणामधे देखिल झाली आहे. वाहन वेबसाइटवर तपासणी केली असता, त्यांना आढळले की वाहन खरोखर दोन आरटीओच्या नावावर नोंदवले गेले आहे. त्यानंतर जेव्हा मुंबई पोलिसांना याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी छाब्रियाविरूद्ध एफआयआर नोंदविली.
छाब्रियाच्या कंपनीतील लोकांव्यतिरिक्त, कर्ज देणार्या तीन - चार एनबीएफसीच्या सहभागाचा पोलिस शोध घेत आहेत. काही प्रकरणांमध्ये पोलिसांना असे आढळले की, वाहन नोंदणी करण्यापूर्वीच एनबीएफसीने कर्ज अधिकृत केले होते. पोलिसांना संशय आहे की एनबीएफसीच्या काही कर्मचार्यांना या घोटाळ्याबद्दल माहिती असेल आणि लवकरच त्यांना चौकशीसाठी बोलावले जाईल.
टिप्पण्या