जाणून घ्या सर्वात मोठे घोटाळे जे नुकतेच घडले आहेत.
भारतात घोटाळे तर सारखे होतच असतात, काही नजरेत येतात तर काही, लोकांच्या नजरेत येऊ देत नाहीत. मात्र कितीही लपवून ठेवायचा प्रयत्न केला, तरी एखादी गोष्ट जास्त काळ लपून राहत नाही. या ना त्या मार्गाने बाहेर पडतेच.
असेच काही लहान आणि मोठे घोटाळे उघडकीस आले आहेत, ज्यांची चर्चा अगदी चार चौघात देखील रंगताना दिसते. अगदी प्रत्येकाला त्याबद्दल माहिती असते, काही प्रमाणात खरी आणि खोटी देखील. अशाच काही नुकत्याच घडलेल्या घोटाळ्यांबद्दल जाणून घेऊया.
पहिला घोटाळा आहे. एक हजार कोटींचा ऑनलाईन घोटाळा. गुजरातच्या एका व्यापाऱ्याने चीनमधुन एक हजार कोटींचा अवैध सावकारीचा घोटाळा केला. त्या व्यापाऱ्याला अटक देखिल करण्यात आले आहे. त्याने बेकायदेशीररीत्या ऑनलाईन पैसे लावले होते.
दुसरा घोटाळा आहे, कोरोनाच्या लासिबद्दलचा. हा घोटाळा जवळ जवळ दहा लाख डॉलर इतका आहे. काही लोकांनी ऑनलाईन एक खोटी जाहिरात टाकली, की कोरोणाची लस आता उपलब्ध आहे. दोनशे पन्नास डॉलर अशी त्याची किंमत देखिल सांगण्यात आली होती, आणि खूप लोक या खोट्या जाहिरातीला फसले देखिल.
मधामध्ये भेसळ होणे हे काही नवीन नाही, मात्र यावेळी थेट घोटाळा केला गेला. ७७% लोकप्रिय ब्रँड्सचे मधाचे नमुने भेसळयुक्त निघाले, या मधामध्ये चीनच्या साखरेची भेसळ केलेली आहे असे केलेल्या तपासामध्ये आढळून आले.
घोटाळे करणारे लोक जास्त काळ लपून राहू शकत नाहीत आणि त्यांची जी काही फसवणूक चालू असते ती देखिल थोड्या काळापुरतीच मर्यादित असते. ते कधी ना कधी जगासमोर येतात आणि त्यांना शिक्षा ही होते.
टिप्पण्या