आयुष्यात काही बदल घडवायचा असेल तर, हे नक्की करून बघा.
आयुष्यात काही बदल घडवायचा असेल तर, प्रयत्न करायलाच हवे. खूप वेळा असे होते की, जे काही घडत आहे त्याबद्दल फक्त तक्रार करत बसणे सोयीचे वाटते. जे काही घडत आहे ते बदलण्यासाठी प्रयत्न करणे देखिल गरजेचे आहे.
आयुष्यात जे काही घडत असते ते आपल्याच क्रियेची प्रतिक्रिया असते. म्हणजे जर जीवनाकडून काही वेगळे हवे असेल, तर प्रयत्न देखिल त्याच दिशेने करायला हवे. नाहीतर आपण फक्त तक्रार करत बसू आणि हाती काहीच लागणार नाही. त्यासाठी काय करायला हवे ते आपण जाणून घेऊया:
प्रश्न विचारणे ही अत्यंत चांगली सवय आहे, असे आपल्याला लहानपणापासून सांगितले जाते. एखादी गोष्ट कळत नसेल तर प्रश्न विचारण्याची सवय लावून घ्या. या सवयीमुळे अर्ध्याअधिक शंका दूर व्हायला मदत होईल. पण ते प्रश्न योग्य असायला हवेत, तुमचे योग्य प्रश्न तुम्हाला योग्य उत्तराकडे घेऊन जातील.
स्वतःला स्वीकारायला शिका, तुम्ही जसे आहात तसे जेव्हा स्वतःला स्वीकाराल तेव्हाच दुसरे आपल्याला स्वीकारतील. गुण दोष हे प्रत्येकामध्ये असतात, आणि ते स्वीकारून आयुष्यात पुढे जाणेच आपल्या प्रगतीसाठी योग्य असते.
आपल्याला सुचलेल्या कल्पना फक्त स्वतःपर्यंत मर्यादित ठेऊ नका. त्या बोलून दाखवा, लोकांशी संवाद साधायला शिका. जेव्हा तुम्ही त्याबद्दल बोलाल तेव्हाच त्या कल्पनांमुळे तुमचे आयुष्य बदलायला मदत होईल. आयुष्य थोडे सोप्पे होईल.
आयुष्य बदलणे आणि त्यात बदल घडवणे हे दोन्ही आपल्या हातात असते. पण त्यासाठी थोड्या गोष्टी स्वतःहून कराव्या लागतात, थोडा वेळ द्यावा लागतो. त्या आपल्यासाठी कितपत कामी येत आहेत याचा अंदाज घ्यावा लागतो.
टिप्पण्या