गुंतवणुकीच्या बाबतीत जर काही निर्णय घ्यायचे असतील तर, २०२१ परफेक्ट का आहे? नक्की वाचा.

आय पी ओ म्हणजेच ( इनीशियल पब्लिक ऑफरिंग) गुंतवणुकीसाठी असलेला सगळ्यात उत्तम पर्याय. यामधे तुमच्या आमच्या सारखे लोक पैसे गुंतवू शकतात, मात्र त्यासाठी देखिल थोड्या ज्ञानाची गरज असते. योग्य वेळी पैसे गुंतवणे आणि योग्य कंपनीमधे पैसे गुंतवणे हे दोन्ही गोष्टींची माहिती असणे तितकेच गरजेचे आहे.

गुंतवलेला पैसा कधी वाढत जातो तर कधी कमी देखिल होतो, त्यामुळे आपले सगळे अंदाज बरोबर असणे गरजेचे आहे. तुम्ही अशा लोकांकडून माहिती मिळवू शकता ज्यांना गुंतवणुकीच्या बाबतीत अनुभव आहे. आणि अशाच काही कंपन्या आहेत ज्या २०२१ मधे सर्वसामान्य नागरिकांसाठी गुंतवणुकीचा मार्ग आय पी ओ द्वारे खुला करणार आहेत.

पहिले नाव आहे फ्लिपकार्ट. या कंपनीचे मूल्यांकन आहे २४.९ अब्ज डॉलर. फक्त ऑनलाईन बाजारातच नाही तर आता फ्लिपकार्ट देणार आहे संधी सर्वसामान्य जनतेला आपल्या कंपनीमध्ये गुंवनुक करण्याची. फ्लिपकार्ट आता 'फ्लिपकार्ट होलसेल' म्हणून ऑफलाईन बाजारात येणार आहे.

झोमॅटो, हे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल, या कंपनीचे मूल्यांकन आहे ३.९ अब्ज डॉलर. या कंपनीने एक वेगळी कल्पना चालू केली, तुमच्या दरात तुमचे अन्न या कंपनीद्वारे पोचवले जाते. आणि आता गुंतवणुकीची संधी देखिल. झोमॅटो हे देशातील सगळ्यात मोठी नवीन कंपनी आहे अन्न पोचवणारी.

तिसरी कंपनी आहे पॉलिसी बाझार. या कंपनीचे मूल्यांकन आहे ३.५ अब्ज डॉलर. या कंपनीच्या आय पी ओ ची तर सगळेच वाट पाहत आहेत. त्यामुळे तुम्ही देखिल ही संधी गमावू नका, आणि योग्य वेळ पाहून पैसे नक्की गुंतवा. अशा लोकांच्या संपर्कात रहा ज्यांना या गोष्टींचे ज्ञान आहे.

तुमचे पैसे दुप्पट करण्याची ही एक चांगली संधी चालून आली आहे, त्यामुळे जेवढे पैसे वाचवून ठेवले असतील तेवढे या गुंवणुकिमधे नक्की गुंतवा. हीच ती योग्य वेळ आहे पैसे गुंतवण्याची, असे जेव्हा वाटेल तेव्हा योग्य सल्ला घेऊन नक्की पैसे गुंतवा.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट