टॅटू काढायचा विचार करत आहात? तर हे नियम नक्की लक्षात घ्या.
आपण जेव्हा टॅटू काढायचा विचार करत असतो तेव्हा हेदेखील लक्षात घ्यायला हवे, की तो आपल्या शरीरावर कायमचा असणार आहे अगदी आपण मरेपर्यंत. त्यामुळे त्याबद्दल विचार करणेही तितकेच गरजेचे आहे. विचार करायचा म्हणजे नक्की काय करायचे?
असे काही नियम आहेत जे लक्षात घेतल्यास, आपल्या खूप प्रश्नाची उत्तरे आपल्याला मिळतील. तर जाणून घेऊया काय आहेत हे नियम..
१. निवड आणि सुरक्षितता :
तुम्ही कोणाची निवड करता हे सगळ्यात महत्वाचे असते. त्या व्यक्तीला तेवढा अनुभव आहे की नाही, हे जाणून घेण्याची जबाबदारी आपली आहे. आपण ज्या ठिकाणी जाऊन टॅटू काढणार आहोत ती जागा साफ आहे की नाही, ते वापरत असलेल्या सुया सुरक्षित आहेत की नाही. याची देखिल खात्री करून घ्या.
२. पैसे वाचवण्याचा विचार त्यागा :
आपल्याला असे वाटते की, कमी खर्च करून एखाद्या स्वस्तातल्या ठिकाणी जाऊन टॅटू काढला तर काय हरकत आहे? पण असा विचार अजिबात करू नका, कारण तो टॅटू आपल्या शरीरावर कायमचा असणार आहे जर तो बिघडला तर त्याहून वाईट काहीच नाही. हे जर टाळायचे असेल तर पैसे साठवा आणि मग एखाद्या चांगल्या ठिकाणी जाऊन टॅटू काढा.
३. योग्य जागा :
शरीराच्या कोणत्या भागावर किंव्हा अवयवावर आपण टॅटू काढत आहोत आणि ती जागा योग्य आहे की नाही हे जाणून घेणे खूप गरजेचे असते. म्हणजेच आपल्या चेहऱ्यावर, मानेवर आणि डोक्याच्या भागावर टॅटू काढू नका. जी जागा आपल्या कपड्यांमधून झाकली जाऊ शकते अशा ठिकाणी आपण टॅटू काढू शकतो.
आणखी एक महत्वाचे असे की, आपण कोणत्या क्षेत्रात काम करत आहोत, त्या क्षेत्रात टॅटू काढण्याला काही बंदी तर नाही ना? हे नक्की जाणून घ्या.
४. निषेध :
जर तुमचा असा विचार असेल की, आपण नावाचा टॅटू काढूया, तर त्या विचाराचा आत्ताच निषेध करा. खूप वेळा लोक नवऱ्याच्या किंव्हा बायकोच्या नावाचा टॅटू काढतात, नाहीतर मग अगदीच प्रेयसी किंवा प्रियकराच्या नावाचा. भविष्यात काय होईल याचे अंदाज बांधणे आपल्याला नाही जमणार.
तुम्हाला एखादे नक्षीकाम असलेल्या टॅटू काढण्याची इच्छा होत असेल तर, अगदीच साध्या नक्षीकामापेक्षा, थोडी आकर्षक अशा टॅटू ची निवड करा.
टॅटूमधे रंगांची निवड देखिल करता येते, मात्र जर तुम्ही खूप गोरे असाल तरच रंगांची निवड करा, कारण ते आपल्या सावळ्या त्वचेवर तितके आकर्षक दिसत नाहीत.
तुमचा जर पहिलाच टॅटू असेल तर, तो आकाराने छोटा च असलेला बरा. आणि तो पाहिल्या नंतर तुम्हाला त्या मागची भावना जाणवायला हवी.
५. टॅटू ची निवड :
आकाराने लहान असलेले टॅटू नेहमीच योग्य निवड ठरतात, पण ते शरीराच्या कोणत्या भागावर काढायचे आहेत याचा नक्की विचार करा. पण त्याच बरोबर त्या टॅटूचा काहीतरी अर्थ असणं गरजेचं आहे. टॅटू काढण्या अगोदर कमीत कमी तीन महिने विचार करा आणि त्यानंतर देखिल तुमचा विचार नाही बदलला तरच टॅटू काढा. टॅटू काढण्याचा निर्णय खूप कमी वयात घेऊ नका, कदाचित तो भविष्यात चुकीचा ठरू शकतो.
६. टॅटू चे महत्व :
खूप वेळा असे होते की, सगळे करत आहेत मग आपण ही करू. जर त्या टॅटू मागे काही अर्थ नसेल, फक्त दाखवण्यासाठी, लक्ष वेधून घेण्यासाठी आपण एखादी गोष्ट केली तर कालांतराने त्याचा कंटाळा येऊ लागतो. त्यामुळे निवड करताना हे नक्की लक्षात घ्या की, तो आपल्यासोबत आयुष्यभर असणार आहे, आपलाच एक भाग असणार आहे. टॅटू नेहमी असा असायला हवा, की तो पाहिल्यानंतर आपल्याला प्रोत्साहन मिळायला हवे.
टिप्पण्या