घडत आहेत अशा काही घडामोडी, ज्या आपण जाणून घेतल्याच पाहिजे.

आपल्या आजू बाजूला अशा काही गोष्टी घडत असतात ज्या कदाचित आपल्याला माहीत देखिल नसतात कारण त्या बातम्या आपल्यासमोर टीव्हीमार्फत येत नाहीत. त्यामुळे तसं काही घडतच नाही असं आपल्याला वाटतं.पण खूप गोष्टी घडत असतात ज्या आपल्याला माहीत असणं ही तितकंच गरजेचं आहे.

या काही बातम्या आहेत भारतातल्या, तर काही भारताबाहेरच्या पण त्या गोष्टींची माहिती असणं देखिल गरजेचं आहे. आपल्या आजू बाजूला जगात काय चालू आहे या गोष्टीची माहिती असणं, कल्पना असणं सगळ्यांसाठीच महत्वाचं आहे.

पाकिस्तानला धमकी देण्यात आली आहे, का? आणि कोणी? पाकिस्तानला धमकी दिली आहे गूगल, फेसबुक आणि ट्विटरने. कारण पाकिस्तान ने या ॲप्स वर खूप सारे निर्बंध लावले आहेत, हे ॲप्स वापरण्यासाठी खूप वेगळ्या आणि नवीन अटी लागू केल्या आहेत. जे या ॲप्सना मान्य नाही आणि म्हणूनच पाकिस्तानला अशी धमकी देण्यात आली आहे की, जर हे निर्बंध काढून टाकण्यात नाही आले तर सर्व सेवा निलंबित केल्या जातील.

रिलायन्स इंडस्ट्रीज ने फ्युचर ग्रुप सोबत २४,७१३ कोटी चा करार केला आहे आणि त्याला मान्यता देखिल मिळाली आहे. या करारासाठी अमेझॉनचा विरोध होता. मात्र खूप प्रयत्नानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज सोबत हा करार मान्य झाला. या करारामुळे खूप साऱ्या नवीन उद्योगांचा देखिल समावेश होणार आहे.

मॅट्रिक्स पार्टनर या कंपनीने 30 कोटी रुपये भारतातल्या नवीन कंपन्यानमधे गुंतवले आहेत आणि आता देखिल त्यांनी एका पुरुषांच्या अंतर्वस्त्र विकणाऱ्या कंपनीमधे 100 कोटी इतके पैसे गुंतवले आहेत. या गुंतवणुकीचा देशाला नक्कीच फायदा होईल.


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट