चॉकलेट सगळ्यांनाच का आवडते? त्यामागची काही कारणे.
सगळ्यांच्याच आयुष्यातल्या सगळ्यात आवडत्या भागाचा एक महत्वाचा साथीदार म्हणजे चॉकलेट, आपल्या बालपणाचा जोडीदार, सगळ्यात सुखद आठवण म्हणजे चॉकलेट. अगदी त्याचा बंगला असावा अशी स्वप्न बघणारे आपले भाबडे मन, मग ते खाऊन कितीही दात किडले तरी हरकत नाही.
तर हे चॉकलेट कशा प्रकारे बनवले जाते? या मधे असतात दूध, संरक्षक, संशोधक, साखर, कोको बटर आणि सगळ्यात महत्वाचं कोको च मिश्रण. कोको हा सगळ्यात मुख्य घटक असतो जो चॉकलेट मधे मिसळला जातो जो कॉकोआ बीन्स पासून मिळतो.
थियोब्रोमा काकाओ या उष्णकटिबंधीय अशा एका झाडाच्या बिया असतात, ज्याचा अर्थ आहे ' देवांचे भोजन ' पण ही झाडे फक्त विषुववृत्तावर च वाढू शकतात.
चॉकलेट आज वेग वेगळ्या देशांमधे वेग वेगळ्या पद्धतीने, वेग वेगळ्या पदार्थांचे मिश्रण करून बनवले जाते आणि खाल्ले जाते. जसे की आइस्क्रीम, केक, मिल्कशेक ई.आणि यामधे खूप सारे असे पदार्थ मिसळले जातात ज्यामुळे आपल्या शरीरात काही बदल घडतात आणि आपले मन प्रफुल्लित होते, आणि आपल्याला चॉकलेट इतके आवडते.
कोकोमधे 'फिनाईलएथिलामीन' नावाचा एक पदार्थ असतो ज्यामुळे आपले ह्रदयाचे ठोके वाढतात, आणि कदाचित म्हणूनच आपण चॉकलेटचा वापर प्रेम व्यक्त करण्यासाठी करतो. आपल्या मनाची स्थिती सेकंदाला बदलत असते, आता आनंदी वाटतं तर लगेच दुःखी या लहरी सांभाळण्याचे आणि जास्तीत जास्त वेळ आनंदी राहण्यासाठी चॉकलेट मदत करते.
चॉकलेट हे सुरुवातीपासूनच गोड नव्हते, त्यामुळे जेवढे आपण डार्क चॉकलेट खाऊ तितकेच ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जेव्हा स्पेन मधील लोक हा गोड नसलेला पदार्थ युरोप मधे घेऊन आले तेव्हा त्यांनी त्यामधे साखर, दूध, लोणी, कोको बटर मिसळले आणि त्याचे रूपांतर एका मिठाई मधे केले. त्यापूर्वी हे एक औषधी काढा म्हणून वापरले जायचे.
चॉकलेटमधे ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे आपण जेव्हा तनावामधे असतो किंव्हा दमलेले असतो तेव्हा चॉकलेट खाल्ल्याने आपल्याला खूप छान वाटते. असं म्हटलं जातं की, आजकाल बाजारात मिळणारे जे चॉकलेट आहेत ते खाल्ल्याने उत्साही वाटते.
सतराव्या शतकातील राजघराण्यात चॉकलेट हे श्रीमंती आणि समृध्दी दाखवण्याचे एक प्रतीक होते. एवढ्या वर्षानंतर देखिल चॉकलेट आपल्याला तितकाच आनंद देत आहे.
टिप्पण्या