म्युच्युअल फंड मधे पैसे गुंतवण्या अगोदर या गोष्टी नक्की लक्षात घ्या.

म्युच्युअल फंड ही एक अशी गुंतवणूक आहे, ज्यामधे सगळ्या गोष्टी या जोखीमीवर अवलंबून असतात. आपण जर ती जोखीम घ्यायला तयार असू तर आणि तरच आपण म्युच्युअल फंड मधे गुंतवण्याचा विचार करू शकतो.

बाजारात होणाऱ्या चढ उतारावर आणि आपल्या जोखीम घेण्याच्या तयारी वर अवलंबून असते, की आपण म्युच्युअल फंड मधे गुंतवणूक करू शकतो की नाही. आपली जोखीम घेण्याची क्षमता किती आहे.

म्युच्युअल फंड मधे पैसे गुंतवण्याअगोदर आपण स्वतः हे शोधून काढले पाहिजे की, आपण किती प्रमाणात जोखीम पत्करू शकतो. आणि ते लक्षात घेऊनच कमी धोका असलेली किंव्हा जास्त धोका असलेली गुंतनुक निवडू शकतो.

या गुंतवणुकीसाठी थोडा अभ्यास देखिल महत्वाचा आहे जसे की, काही महिण्यामधे बाजारात चढ उतार कसे चालू आहेत, कोणती गुंवणुक जास्त फायदेशीर आहे, कोणत्या गुंतवणुकीमध्ये जास्त जोखीम आहे. ती घेणं आता योग्य आहे की नाही? वैगरे वैगरे.

तिसरी आणि सगळ्यात महत्वाची बाब अशी की, जेव्हा तुम्ही कोणती आणि काय गुंतवणूक करायचे हे जेव्हा निश्चित कराल त्यानंतर ती गुंतवणूक एका विश्वासार्ह व्यासपीठावरून करा, आणि वेळो वेळी ते तपासत रहा. आपली गुंतवणूक योग्य आहे की नाही, ती गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे की नाही ते यावरून तुम्हाला नक्की कळेल.

पैसे जर पडून राहिले तर ते तसेच राहतील पण जर ते गुंतवले तर ते वाढत जातील आणि त्या पैशांचा काहीतरी फायदा होईल. जोखीम घ्यायचीच झाली तर ती सगळा अभ्यास करून, सगळे खाच खळगे ओळखून करायला हवी.  


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट