नकारात्मक विचारांपासून दूर कसे राहावे.
सकारात्मक विचार जितके फायदेशीर असतात आपल्यासाठी, त्याहून नकारात्मक विचार जास्त हानिकारक असतात. ते आपल्या आयुष्यावर, आपल्या आयुष्याच्या निर्णयांवर नकळत परिणाम करतात. आपले विचार सकारात्मक आहेत की, नकारात्मक त्यावर आपले निर्णय अवलंबून असतात.
मग या नकारात्मक विचारांपासून दूर कसे राहायचे? जास्तीत जास्त सकारात्मक विचार आत्मसात कसे आणायचे? त्यासाठी आपण काय करायला हवे? याबद्दल तुम्हाला कधी कोणी सांगितले आहे का? नसेल सांगितले, तर या गोष्टी नक्की करून पाहा.
सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की, जर तुम्हाला सकारात्मक राहायचे असेल तर अशी कोणतीही गोष्ट ज्या मधून तुम्हाला सगळ्यात जास्त आनंदी वाटतं, मग ती गोष्ट काहीही आणि कोणतीही असू शकते. अगदी कोणाला खरेदी करायला जावेसे वाटेल किंव्हा घरी नुसतेच बसून रहावेसे वाटत असेल. तुम्हाला जे आवडेल ते करा, मात्र सगळं विसरून स्वतःला थोडा वेळ द्या.
दुसरी पद्धत अशी की, एखाद्या अशा कामाची सुरुवात करा जे तुम्हाला खूप चांगले जमत असेल आणि आवडत देखिल असेल. असे केल्याने होईल काय की, तुम्ही एखादी कामगिरी उत्तम रित्या पार पाडली तर स्वतःला शाबासकी देता येईल आणि आपल्या यशाची पोच पावती ही मिळवता येईल. आणि एखाद्या गोष्टीमधे छोटं का होईना यश मिळत असेल तर आनंद हा होणारच.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की, आपले विचार हे आपल्या आजू बाजूच्या लोकांवर देखिल अवलंबून असतात आणि त्यामुळे आपला वेळ आपल्या माणसांसोबत घालवा जे आपल्यावर प्रेम करतात, ज्यांना आपली खरच काळजी वाटते. त्यांच्याशी बोलल्यामुळे, त्यांना भेटल्यामुळे जो फरक पडतो तो आपल्याला जाणवतो, मनावरचा खूप मोठा भार हलका झाल्यासारखा वाटतो आणि ते जाणवते.
आपले आजू बाजूचे लोक, आपले आजू बाजूचे वातावरण कसे आहे? याचा आपल्या मानसिक आरोग्यावर खूप मोठा परिणाम होत असतो, काही लोकांना ते जाणवते आणि व्यक्त ही होता येते, तर काही लोकांना फक्त जाणवते मात्र व्यक्त होता येत नाही. तर या काही गोष्टी नक्की करून पाहा.
टिप्पण्या