गूगल ने दिली आहे एक नवी संधी पैसे कमविण्यासाठी.
गूगल बद्दल आपल्या सगळ्यांना खूप काही माहीत आहे, अगदी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर आपल्याला गूगलवर मिळते. अगदी सेकंदामधे आपण काहीही शोधू शकतो, एखादी गोष्ट, जागा, वस्तू काहीही. एखादा मुद्दा चूक आहे की बरोबर हेदेखिल आपण सेकंदात सिद्ध करू शकतो, गूगलच्या मदतीने.
पण हेच गूगल आणखी एक नवी संधी मिळवून देणार आहे पैसे कमविण्याची त्यांच्या एका योजनेमार्फत. ज्यामधून कोणीही अगदी कोणीही पैसे कमवू शकते. फक्त त्यासाठी काही अटी लागू होतील.
गुगल सुरू करणार आहे योजना ' टास्क मेट ' नावाची. तर योजनेमधून तुम्ही पैसे कसे मिळवू शकता? पण त्याअगोदर ते पैसे आपल्या पर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला एका ई- वॉलेट ची गरज असणार आहे, ज्यामधे हे पैसे जमा होऊ शकतील, आणि आपण त्यांचा वापर करू शकू.
तर या टास्क मेट द्वारे पैसे कसे कमवता येतील याचे दोन पर्याय दिले जातील, ज्यामधे आपण घरी बसून काम करू शकतो आणि दुसरा पर्याय असा की ज्यामधे आपल्याला बाहेर जावे लागेल. घरी बसून करण्यात येणाऱ्या कामामध्ये आपल्याला काही वाक्य नोंद करावी लागणार आहेत, भाषांतर करावे लागणार आहे, लिप्यंतरण करावे लागणार आहे आणि असेच आणखी काही.
बाहेर जाऊन करण्याच्या कामामधे आपल्याला घराबाहेर पडून काही फोटो काढावे लागतील आजू बाजूच्या जागेचे, किंव्हा ती जागा ओळखता यावी म्हणून आजू बाजूचे काही नेमके फोटो गूगल मॅपसाठी. आणि या गोष्टी चे तुम्हाला पैसे मिळतील.
कोणत्या देशाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे, हे अजून जाहीर झालेले नाही, पण तुम्हाला असं वाटत आहे का, की या नवीन योजनेमार्फत तुम्ही देखिल पैसे कमवू शकता आणि ही योजना खूप फायदेशीर ठरणार आहे.
टिप्पण्या