तुमच्या मते कोणता उद्योग भविष्यात खूप पुढे जाणार आहे?

एखादा नवीन उद्योग असेल तर त्यामधे जोखीम ही आलीच, पण जर ती जोखीम सगळ्या गोष्टींचा हिशोब ठेऊन घेतली असेल आणि जोखीम घेणाऱ्याची दूरदृष्टी चांगली असेल तर, नफ्याच्या आस पास तरी नक्कीच पोहचू शकतो. आणि यश ही मिळू शकते.

असेच काही उद्योग सध्या बाजारात आले आहेत, ज्या मधून खूप फायदे आहेत, पण भविष्यात त्याचा कसा आणि काय उपयोग होतो त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. कोणाचा किती फायदा होतो किती नुकसान ते आता कळणार नाही, मात्र कळेल नक्की.

याच उद्योगांमधला पहिला आहे गेमिंग. या गेम चं नाव तर सगळ्यांना च ठाऊक असेल, पब - जी. या गेम ने युवकांना अगदी वेड लावलं आहे, पण या गेम ने फक्त २०२० मधेच २ अब्ज इतके पैसे कमवले आहेत. हा तर फक्त एका वर्षाचा हिशोब आहे, जे वर्ष अजून चालू आहे. हा आतापर्यंत चा सर्वाधिक कमाई करणारा गेम आहे.

दुसरा उद्योगाचा स्तोत्र आहे व्हॉट्सॲप. व्हॉट्सॲप ने नुकताच एक खरेदीसाठि नवीन पर्यायाचा मार्ग खुला केला आहे. जो सगळ्यांनाच वापरता येणार आहे, त्यांच्या मते खूप सोयीचा देखिल असणार आहे. कोणाच्या सोयीचा, कितपत आहे हे तर कळेलच मात्र जास्त लोकांपर्यंत आपला उद्योग पोहचवण्याचा हा खूप सोप्पा मार्ग आहे. 

तिसरी आणि सर्वात महत्वाची बातमी अशी की, रिलायन्स ही कंपनी ५० दशलक्ष डॉलर इतके पैसे बिल गेट्स यांच्या ब्रेकथ्रु एनर्जी या प्रकल्पामधे गुंतव‌णार आहेत. आणि या निधीचा उपयोग ते स्वच्छ आणि टिकाऊ ऊर्जा संसाधनांमधे करणार आहेत. उदाहरणार्थ सौर ऊर्जा, पवन उर्जा ई.

हे सगळे जे नवीन उद्योग बाजारात येत आहेत त्याने, त्या उद्योगाला, सामान्य माणसांना, देशाच्या अर्थव्यवस्थेला किती, कसा, आणि काय फायदा होईल हे नक्कीच पाहण्यासारखे आहे.


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट