Luck and Coincidence
Luck and Coincidence
काही लोक coincidence accept च करत नाहीत तर, काही लोकांना सगळ्या गोष्टी केवळ योगायगाने होतात असंच वाटत असतं.
आपल्या आयुष्यात येणारे लोक हे योगायोगाने नाही तर नियतीने ठरवून आणलेले असतात, काहींना वाटते की त्यांचे येणे निव्वळ योगायोग आहे.
पण जिथे नशिब आणि योगायोग एकत्र येतात तिथेच लोक एकमेकांना भेटतात, किव्हा नकळत एखादा प्रसंग घडतो.
तो चांगला की वाईट हे आपणच ठरवतो, आपल्या सोईप्रमाणे. एखादी गोष्ट आपल्यासाठी चांगली असेल परंतु समोरच्यासाठी नाही तरीही, ती गोष्ट चांगलीच घडली आहे असे आपण मानतो.
एखादी संधी आपल्या आयुष्यात येते, कष्टाने कीव्हा योगायोगाने पण जर त्यामागे आपल्या 1% नशिबाने साथ दिली नाही तर मात्र, हाता तोंडाशी आलेला घास निसटून जातो.
योगायोग खरा असतो की खोटा माहीत नाही पण प्रत्येक जण आपल्या आयुष्यात एकदा तरी यावर विश्वास ठेवतच असतो. कधी कधी असेही होते की, खुप कष्ट करून देखिल यश मिळत नाही मग लोक म्हणतात की ' नशिबाचा भाग दुसरं काय '. पण खरच नशिबामुळे की आपले कष्ट कमी पडले म्हणून...
नशिब आणि योगायोगाच्या गोष्टी असं बोलणारे लोक, कुठेतरी त्यांचे प्रयत्न कमी पडल्यामुळे आणि थोडा संयम न पाळल्यामळे च अर्ध्यावर हार मानतात.
टिप्पण्या