Imagination
Imagination
कोणतं जग सुंदर असेल तर हेच ते Imagination चं. जिथे सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात, तिथे काय होणार, कोण असणार, कोण नसणार. काय घडलं पाहिजे काय नाही, सगळं फक्त आणि फक्त आपण ठरवणार.
कधी कधी खरचं मनात असा विचार येतो की, आपल्या आयुष्यातही असं घडलं तर, सगळ्या गोष्टी जशा आपल्याला हव्या आहेत तशाच घडल्या तर.....
तिथे फक्त आणि फक्त आपली मर्जी चालते. एखादी situation imagine करताना खूपदा असा विचार येतो की, ' नाही हे असं नाही घडू शकत खऱ्या आयष्यात ' आणि मग दुसऱ्याच सेकंदाला असाही विचार येतो की, ' काय फरक पडतो आपलं जग आहे, आपलं imagination आहे आणि आपली मर्जी, जे हवं ते imagine करा, who cares '.
आपल्या खऱ्या जगात आणि imagination च्या world मध्ये खूपसं अंतर असतं पण जेव्हा कधी आपल्याला आपला 'me time' मिळतो तेव्हा याच जगात रमायला जास्त आवडतं.
या
जगात आपण कुठे ही कधीही फेरफटका मारून येऊ शकतो कोणासोबतही, कोणीही आपल्याला judge करणारं नसतं अडवणार नसतं, तिथे फक्त आणि फक्त आपली मर्जी असते आपलं स्वातंत्र्य असतं असं स्वातंत्र्य जे खऱ्या जगात मिळेल की नाही ते ठाऊक नाही.
पण आपण आपल्या imagination च्या जगात कितीही रमलो तरी आपल्या खऱ्या जगात यावच लागतं, life ची reality face face करावीच लागते.
कधी कधी आपण imagine केलेल्या गोष्टी आपल्या आयुष्यात का नाही घडल्या याचं reason मिळाल्यावर समाधान देखील वाटतं.
टिप्पण्या