Part-1...

विश्वास 

                       आम्ही tea time मध्ये चहा घेत बसलो होतो, आम्ही म्हणजे श्रेया, जान्हवी आणि मी सानवी. आम्ही आमच्याच जगात होतो जान्हवी नेहमी प्रमाणे आम्हाला 'mobile use करू नका at least इथे तरी' असं सांगायचा प्रयत्न करत होती, आणि आम्ही नेहमी प्रमाणे तीच ऐकत नव्हतो. 
             
            तेवढ्यात तिथे सुरज आला, तो आमचा एक colleague आणि मित्र देखिल. आमच्याशी काहीतरी बोलण्यासाठी च तो आला होता, मात्र काहीतरी गंभीर होत पण त्याची आम्हाला थोडी देखील कल्पना असणं शक्यच नव्हतं. 
              
                श्रेया ने सुरज ला 'काय झाले' म्हणून विचारले मात्र तो थोडा अडखळत बोलत होता, कदाचित बोलावे कि नाही या संभ्रमात असावा. मात्र लपवण्यात काही अर्थच नाही हे कदाचित कळल्यामुळे त्याने आमच्याशी बोलायला सुरुवात केली. जर त्याने सांगितले नाही तर आम्हाला ती गोष्ट कुठून हि कळणारच होती, मग ती चुकीच्या पद्धतीने पोहचण्या पेक्षा सुरज ने सांगणंच योग्य होत. 
              
              'प्रिया बद्दल तूम्हाला काही कळाले का?'; सुरज. कशाबद्दल बोलतोयस तू? आमच्या मनात असंख्य प्रश्न होते, आणि नेमका अंदाज कुठेच लागत नव्हता. रीमा canteen मध्ये येताच सुरज थोडा सावध झाला. रीमा-प्रियाची best friend. आम्ही सगळे नेहमी एकत्र बसूनच चहा घेतो म्हणून रीमा बाजूलाच बसली आणि आमच्या अचानक शांत बसण्याने तिला सगळी परिस्थिती समजली. 
               
                'मला माहित आहे तुम्ही कशाबद्दल बोलत आहात ते तुम्ही बोलू शकता माझ्या समोर'........ 

 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट