Difficulties

Difficulties
         
        संकटं जेव्हा आपल्या आयुष्यात येतात तेव्हाआपल्याला एकच प्रश्न पड़तो 'मी च का?' पण त्याच संकटांच्या ऐवजी, जर आनंद, सुख आपल्या आयुष्यात असेल तर मात्र हा प्रश्न डोकावत देखिल नाहीमात्र आपण एक गोष्ट सोईने विसरतो, ती म्हणजे आपल्या आयुष्यात येणारी संकटं आपल्याला मजबूत बनवत असतात. कोणती Situation कशी Face करायची हे या काळातच शिकायला मिळते. 
          माणसांची, वेळेची, पैशाची किम्मतही वाईट वेळच आपल्याला दाखवून देते मग या एवढ्या चांगल्या काळाला आपण हिम्मतीने सामोरे जायला नको का? संकटांच्या काळात सकारात्मक गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायला हवे, तरच संकटांचा सामना करने सोप्पे जाते. 
          प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यातले Problems मोठे वाटतात आणि दुसरी व्यक्ती आपल्या पेक्षा सुखी आहे असे वाटते. पण खरच तसे असते का? कधी-कधी Imagine देखिल करू शकत नाही असे Problems लोकांच्या आयुष्यात असतात. आणि आपण त्यांचे आयुष्य जगता यावे अशी इच्छा मनोमन व्यक्त करत असतो.
           आपल्या Point of view वर अवलंबून असते की, आपण आपल्या Difficulties कशा Face करत आहोत. 
      

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट